हिवाळ्यातील आजारांवर उपाय How to treat winter diseases in marathi



treat winter diseases
treat winter diseases



आपल्या पहिल्या लेखात आपण हिवाळ्यात होणारे आजार बघितले तर ह्या लेखात आपण त्या आजारांवरील तोडक्यात उपाय पाहणार आहोत .

          केस आणि त्वचा दोन प्रकारच्या तक्रारींवर अभ्यंगस्नान हा अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक उपचार आहे पहाटे उठून अंगाला शुद्ध तेलाने मसाज करणे आणि काही वेळानंतर औषधी उटणे लावून स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान होय. तेलाच्या मालिशमुळे त्वचेला स्निग्धता मिळते. त्यामुळे त्वचेला येणारा कोरडेपणा कमी कमी होतो आणि काही दिवसांनी तो पूर्णपणे नाहीसा होतो. तसेच उटण्यामधील विविध औषधी घटकांमुळे त्वचेचे चांगल्याप्रकारे पोषण होते आणि त्वचेच्या तक्रारी बऱ्याच बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

          केसांच्या आरोग्यासाठी सुध्दा नियमितपणे केसांना तेल लावणे आवश्‍यक असते यामुळे केसांच्या मुळाशी असणारी त्वचा स्निग्ध होते. शिवाय त्वचेतील रक्तवाहिन्यांचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांचा पोत सुधारतो केसांच्या मुळाशी उठणे लावून ते पाण्याने धुतले तर ही चांगला परिणाम दिसून येतो आठवड्यातून दोनदा हा उपाय केला तर काही दिवसात केसांच्या तक्रारी हमखास कमी होतात.

         हिवाळ्यामध्ये येणारी फळे भाज्या भरपूर प्रमाणात खाणेसुद्धा उपयोगाचे ठरते . या दिवसात मोठे आवळे आणि गाजर भरपूर प्रमाणात येतात हे दोन्ही पदार्थ त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. तक्रारी असल्या म्हणजे यांचे सेवन करावे असे नाही तर नियमितपणे त्यांचे सेवन केले तर या तक्रारी उत्भवणार नाहीत .वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्‍तींना त्वचेच्या आणि केसांच्या तक्रारी अधिक प्रमाणात जाणवतात कारण वादळाच्या प्रभावामुळे अशा अशा व्यक्तींची त्वचा मुळातच कोरडी असते त्यामुळे अशा व्यक्तींनी वाताचे संतुलन राखण्यासाठी योग्य ते उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

          बदलत्या  वातावरणाला  सामोरे जाण्याची शक्ती कमी पडते म्हणून अशा समस्या उत्भवतात  आणि म्हणूनच प्रत्येकांमद्ये बदलेल्या  हवामानामुळे सारख्याच तक्रारी दिसतात  असे  नाही.  म्हणूनच आपल्या प्रकृतीनुसार प्रत्येकाने स्वतःचे  निरीक्षण करून सकस आहारावर भर द्यावा त्यासोबतच योग्य व्यायाम आणि चांगल्या सवयीचा  आधार घेऊन आपली प्रतिकारशक्ती  वाढवावी . कारण संतुलित आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे प्रतिकार शक्ती क्षीण होत जाते म्हणूनच अनेकांना वातावरणात थोडा बदल झाला तर ही किरकोळ आजार उत्भवतात म्हणून ऋतुबदलामुळे होणारे वातावरणातील परिणाम सहजपणे सहन करता यावेत यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे ठरते.

         हिवाळ्यामध्ये पचन शक्ती वाढलेली असते अशा वेळी पौष्टिक आहार घेतला तर त्याचा फायदा संपूर्ण आरोग्यालाच मिळतो म्हणूनच या दिवसांत सुकामेवा, डिंक ,साजुक तुपाचे केलेले लाडू अवश्य  खावेत. तसेच हळवीचे लाडू देखील खाणे चांगले असते . शक्यतो हे लाडू गुळ घालूनच करावे शिवाय हिवाळ्यामदे आपला दैनंदिन आहार सुद्धा सकस  ठेवावा. भरपूर भाज्या आणि पोलंडचा  सॅलडचा त्यामध्ये समावेश असावा. घराबाहेर पडताना हात-पाय कपड्याने शक्यतो झाकलेले असावेत  शिवाय  गाडीवर जाणार  असाल  तर  केसांवरही  स्कार्प  बांधावा म्हणजे  कोरड्या  हवेमुळे  केस आधीक कोरडे  होणार  नाहीत .थंडी आहे म्हणून आंगोळीसाठी अधिक  गरम  पाणी घेऊ  नये  त्यामुळे त्वचा अधिक कोरडी बनते  दूध  आणि घरी  बनवलेले  तूप  यांचाही  नियमित आहारात समावेश  करावा .भाज्यांचे  वेगवेगळ्या  प्रकारचे  सुपदेकील  आरोग्यासाठी  चांगले असते अश्याप्रकारे  थोडी काळजी घेतली तर हिवाळ्यात होणाऱ्या त्रासापासून सहज दूर राहता येऊ शकते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट