हसा आणि निरोगी राहा.Have a smile and a healthy.



smile and a healthy.
smile and a healthy.


हसा आणि निरोगी रहा ही सोपी म्हण प्रत्येकालाच माहीत असेल. खळकळून हसणं हे निफ्फट मनाचा लक्षण आहे. लहान मुलांना काही समजत नसतं ना बोलता येत असतं. लहान मुलं खूप हसत असतात. त्यांचा हे हसणं निरागस मनाचा प्रतीक असता.
     
         हसमुख व्यक्ती प्रत्येकालाच आवडतात. सतत उदास चेहरा घेऊन वावरणाऱ्या लोकांपेक्षा हसऱ्या व्यक्ती पटकन लक्षात राहतात. हसणारे आणि हसवणारे प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. 'चला हवा येऊ द्या', 'द कपिल शर्मा शो' पाहून कित्येकांना रिलॅक्स वाटतं. अनेक कॅन्सर सेंटरमध्ये रुग्णांना हे शो दाखवले जातात उद्देश इतकाच असतो की त्यांना वेदना विसरण्यास थोडी मदत व्हावी.

          हसणं मानवाचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. रडण्यामुळे जसे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात तसेच हसण्यामुळेही. हसणं  हा एक उत्तम व्यायाम आहे. एक असा व्यायाम जो आपल्या शरीरातील अनेक प्रकारे उपयुक्त आहे.

       हसण्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो. शरीरात जे 'स्ट्रेस हार्मस'असतात त्यांची पातळी कमी होते. नैराश्य, अस्वस्थाता आशा ज्या  नकारात्मक भावना असतात, हसण्यामुळे कमी होत असतात. पर्यायाने उच्च रक्तदाब आटोक्यात राहतो. याचबरोबर हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. खासकरून अशा रुग्णांसाठी ज्यांना  दुसरा व्यायाम करता येणे शक्य नाही. असे मानले जाते की 100 वेळा हसणे हे पंधरा मिनिटे व्यायाम केल्याप्रमाणे आहे.

             हसणं  हा पोटासाठीही चांगला व्यायाम आहे. हसत असताना पोटाच्या स्नायूंसाठी व्यायाम होत असतो. फ्लॅट हमी मेटेन करण्यास मदत होते. हसण्यामुळे आपल्या शरीरात टी सेल कार्यरत होत असतात. या आपल्या शरीरांतर्गत असतात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करत असतात. हसण्याने यांची क्षमता, ताकद वाढते.

           हसण्याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, हसण्यामुळे वेदना विसरण्यास मदत होते. हसण्यामुळे इंडॉर फिनच्या निर्मितीस मदत होते. Endorphin हे आपल्या शरीरातील एक असे रसायन  आहे, ज्याला नैसर्गिक, वेदनाशामक असेही म्हणतात. शरीरांतर्गत याच्या स्रवणाने आपल्याला  वेदना विसरण्यास मदत होते. या शिवाय मूड  बनवण्यामध्येहि या रसायनाची चांगली मदत होते. एक प्रकारे  'फील गुड' ची भावना  निर्माण होते. सकारात्मक भावनेची निर्मिती होते.

           वास्तविक endorphin चे काम थोडेफार मॉर्फीन या ड्रुग्सशी मिळतेजुळते आहे . पण मॉर्फीन सारखा त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही कारण नैसर्गिकरित्या ते आपल्या शरीरात बनवले जाते. हसणं शासनाच्या आजारांमध्येहि उपयुक्त आहे. दीर्घश्वास किंवा प्राणायामाचा  जसा आपल्याला फायदा होतो त्याच प्रकारचा फायदा हसण्यामुळे होतो. विशेषतः दम्याचा विकार असणाऱ्यांसाठी हसणे हा उत्तम व्यायाम आहे.

       हसणे हा एक संसर्गजन्य आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. एखाद्याला खूप हसताना  पाहून आपल्यालाही नकळत हसू येत. निखळ हसण्यामुळे एक सकारात्मक उर्जा सभोवती पसरत असते. त्याचबरोबर हसणाऱ्यांच्या सहवासात राहिल्याने एक आपल्यातील नकारात्मक शक्तींचा ऱ्हास होत असतो. या भावनेने प्रेरित होऊन डॉक्टर मदन कटारिया यांनी 10 जानेवारी 1998 रोजी  पहिला  'हास्यदिन' साजरा केला. दरवर्षी मे चा पहिला   रविवार हा जागतिक हास्यदिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच हसत राहावे आणि हसवत राहावे .



     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट