हिवाळ्यातील आजार winter disease in marathi
![]() |
winter disease |
भारतातल्या तीन ऋतूंपैकी हिवाळा एक ऋतू काही जणांना हिवाळा आवडत असला तरी काहींना हिवाळ्यात आजारांना सामोरे जावे लागते जसे की पोटाचे , वाताचे , त्वचेचे , आणि केसांचे आजार .
आरोग्याच्या दृष्टीने अनेक व्यक्तींना हिवाळा हा ऋतू त्रासदायक ठरतो. त्या मागची कारणे वेगवेगळी असतात. हिवाळ्यामध्ये अनेकांना सांदेदूकिच्या वेदनांचा त्रास होतो. हाता-पायांत वात अथवा गोळे येणे, त्यांची बोटे वाकडी होणे ही लक्षणेही काहीजणांमध्ये दिसतात. पण तात्पुरता त्रास म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. खासकरून दुर्लक्ष
करण्याच्या स्त्रियांच्या वृत्तीमुळे त्यांच्यात हे प्रमाण जास्त दिसते. परंतु, अशा त्रासाकडे तात्पुरते उपचार करून सामान्य तक्रार म्हणून पाहू नये.
या दिवसात अनेकांना पोटाच्या तक्रारीला सुध्दा सामोरे जावा लागत . अनेक व्यक्तींना हिवाळ्यामध्ये अकारण पोटात मुरडा येणे, गैस तयार होणे, वारंवार शौचास जावे लागणे,अपचनाची लक्षणे इत्यादी तक्रारी सुरू झालेल्या जाणवतात. बाहेरचे पदार्थ खाल्ले नाहीत, तरीही पोट फुगल्यासारखे वाटणे, अस्वस्थ होणे अशीही तक्रार दिसते.
तसेच या दिवसांत सर्वच वयोगटांतील व्यक्तींमध्येळणारी तक्रार म्हणजे, त्वचा तडतडणे त्वचेला खाज सुटणे, क्वचितप्रसंगी त्यातून रक्त येणे, टाचांना भेगा पडणे, अशाही तक्रारी दिसून येतात.
शरीरावर असणारी त्वचा हीशरीराचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम करत असते. बाहेर असल्यामुळे बदलणाऱ्या हवामानाचा सर्वात प्रथम त्वचेवर परिणाम दिसून येतो. मानवी त्वचेचे एकूण तीन स्तर असतात
सर्वात बाहेरच्या स्तरामध्ये रक्तवाहिन्यांचे खूप मोठे जाळे असते. त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असणारा प्राणवायू आपल्याला रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणाने मिळत असतो. थंड किंवा खूप जास्त थडं वातावरणातील हवेमुळे रक्तवाहिन्यांच्या आकुंचन व प्रसरण क्रियांवर काहीसा दुष्परिणाम होतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येऊन त्वचेला आवश्यक असणारे पोषण कमी पडते आणि त्याचा परिणाम म्हणून त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. कोरडी झालेली त्वचा पांढरट होऊन तिला खाज सुटते. अशी त्वचा खाजवल्यावर त्यातून रक्तही येण्याची शक्यता असते.
हिवाळ्यामद्ये त्वचेच्या समस्येमुळे उत्भवणारी समस्या म्हणजे केस गळणे होय. केसात कोंडा निर्माण झाल्यामुळे केस गळण्याची समस्या सुरु होते. ह्यामागे अजून काही कारणे असतात जसे की त्वचेच्या कोरडेपणामुळे केसात कोंडा होतो कोंड्यामुळे डोक्यात खाज सुटते ती खूप त्रासदायक असते .आहारातील पोष्टीकता कमी झाल्यामुळे याप्रकारच्या समस्यांना हिवाळ्यातच नाही तर इतर ऋतू मद्ये सुद्धा त्रास सहन करावा लागतो .थंडीमुळे त्वचेच्या आतील रक्तवाहिनीच्या आकुंचन व प्रसारणावर परिणाम होतो आणि प्राणवायूचे वहन विस्कळीत होते. त्यामुळे आवश्यक घटक केसांच्या मुळापर्यंत पोचत नाही आणि केसांच्या तक्रारींमद्ये वाढ होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा