बदाम आणि आरोग्य Almonds and health
![]() |
Almonds and health |
प्रत्येक बदामात कोलेस्ट्रॉलशी लढण्याची ताकद असते. त्यामुळे बदामचा नियमित आहारात समावेश करणे गरजेच आहे. हिरवा किंवा कच्चा बदामात अनेक प्रकारचे पोषकतत्त्व असतात. या बदामात औषधी गुण देखील आहे. यासंबंधी झालेल्या अनेक संशोधनांतून महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्या म्हणजे त्वचा आणि केसांसाठी बदाम फायदेशीर आहेत. हिरवा बदाम हा अँटीऑक्सीडेंटची पातळी देखील चांगली असते. हा बदाम शरीरातील हानिकारक पदार्थांना बाहेर काढून इम्युन सिस्टिमच्या ऍक्टिव्हिटीला बूस्ट करण्याचे काम करते. हिरव्या बदामाच्या आहाराने अनेक आजारांचे जोखीमही कमी होते. मेंदूसाठी देखील बदाम पोषक मानले जाते. बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी हिरवा बदाम उपयुक्त मानला जातो.
हृदयासाठी हिरवा बदाम फायदेशीर या बदामात फ्लेवनाईड आणि बायोफ्लेवनाईड आढळून येतात. हे तत्त्व अँटीऑक्सीडेंटच्या रूपात काम करते. यासंबंधी झालेल्या संशोधनातून बदाम खाल्याने हृदयविकाऱ्याच्या झटक्यांची जोखीम कमी होते.
हाड आणि दात मजबुत बदामात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. त्यातून हाड आणि दातांना फायदेशीर ठरते. बदाम खालल्याने हिरड्या देखील मजबूत होतात. त्यानुसार जे नियमित बदामचे सेवन केल्यास हाडासंबधी असलेल्या विकारांची जोखीम
कमी होते.
स्थूलपणा कमी करण्यासाठी जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर हिरवे बदाम खावे. या बदामात हेल्ड्य हेल्दी फॅट असते. हे शरीरातील अतिरिक्त फॅट वाढीला रोखण्याचे काम करते. यात कॅलरीजचे प्रमाणही अधिक नसते. त्याचबरोबर फायबरचे प्रमाण चांगले असते. यातून पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
त्वचेसाठी उपयुक्त बदामात अँटीऑक्सीडेंटस आढळून येतात. विटामिन 'ई' महत्त्वाचे अँटीऑक्सीडेंटस ओळखले जाते. आणि त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात. त्याच बरोबर त्वचेतील हानिकारक पदार्थ बाहेर काढून त्वचा विकाराची जोखीम कमी करतात. इ जीवनसत्त्व ॲन्टी एजिंग कंपनीच्या रूपाने काम करते. आणि नियमित सेवनाने त्वचा नितळ व चकचकीत राहण्यास हातभार लागतो.
केस मजबूत होतात जर आपल्याला केस गळण्याचे समस्या भेडसावत असेल तर बदामाचा आहार उपयोगी होऊ शकतो. यात प्रोटीन, व्हिटॅमिन लोह, झिंक यांसारखे तत्व आदळून येतात. या तत्त्वामुळे केस काळे आणि मजबूत राहतात. तसेच शरीरातील रक्तप्रवाह देखील वेगाने होतो. हिरवे बदाम खाल्ल्याने केसांचे आजार रोखण्यास मदत होते.
पीएच लेव्हल संतुलित हिरव्या बदामात शरीरातील पीएच लेव्हल संतुलित राखण्याचा गुण असतो. हा गुण शरीरातील असिडची पातळी रोखण्याचे काम करतो. जर शरीरातील असिडची पातळी वाढली तर त्या ऑस्टिओपोरीस, शरीरातील उर्जा घट, रोग प्रतिकारशक्तीत घट, वजन वाढणे यासारख्या समस्या होऊ लागतात. त्यासाठी शरीरातील असिड लेव्हलची पातळी राखण्यासाठी हिरव्या बदामात पॉवरफुल अँटीऑक्सीडेंटस आहेत. या गुणांच्या आधारे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी बदाम गुणकारी मानले जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा