हॅन्ड सॅनिटायझर वापरतय ? Using Hand Sanitizer?


Hand sanitizer
Hand sanitizer


आरोग्य निकोप राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. विशेतः लहान मुलांच्या हाताची काळजी घ्यावी लागते. परंतु, सॅनिटायझरच्या वापराने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात ह्याबद्दल  किती मंडळींना ठाऊक आहे याचा अंदाज नाही.

         नकळतपणे लहान मुले अनेक अस्वच्छ ठिकाणी हात लावतात. उदाहरणार्थ गच्चीवर कपडे, पायऱ्या, मातीतला चेंडू, बूट किंवा चप्पलला हात लावणे, भिंतीला हात लावणे यासारख्या असंख्य मार्गाने मुलांच्या हातावर जंतू बसतात. हे जंतू काढण्यासाठी सॅनिटायझरचा काहीजण वापर करतात. सॅनिटायझरने हात स्वच्छ राहतात असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यामुळे काही पालक मंडळी शाळेतील मुलांसोबत सॅनिटायझरची बाटली देतात. परंतु, सॅनिटायझरच्या वापराने त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात, ही बाब कमी मंडळींना ठाऊक आहे. सॅनिटायझरने जंतू मरतात असे सांगितले जाते.

            प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. काही सॅनिटायझर जंतूंची निर्मिती करतात आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो असे दिसून आले आहे. त्यामुळे सॅनिटायझरने आहात सुरक्षित राहतील, असे जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

ट्रीकोलसन्स हे हॅन्ड सॅनिटायझरमध्ये वापरले जाते. हातावरच्या बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मात्र अधिक वापर केल्यास ते हानिकारक ठरू शकते. हे द्रव्य हातावरचा राहते आणि आहार करताना ते शरीरात जाऊ शकते. ही बाब धोक्याची घंटा ठे. शरीरातील नाजूक अवयवांना ट्रीकोलसन्स मारक ठरते.

 पाराबेन्स बहुतेक हॅन्ड सॅनिटायझरमदे liquid  केमिकल समावेश असतो . त्याला पाराबेन्स असेही  म्हणतात. हातावर बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी या केमिकल्सचा वापर करतात. परंतु, हे केमिकल हाताला लावण्याने किंवा पोटात गेल्याने त्यापासून आरोग्याशी निगडित अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यात कर्करोग, मेंदूविकार, आंत: स्रावाचे आजार यांसारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. याशिवाय त्वचेवरही परिणाम होतात. त्यामुळे ईथी पाराबेन्स, ब्युटीपाराबेन्स, मेथीलपाराबेन्स आणि प्रोपिलपाराबेन्स या घटकांचा समावेश असलेले हॅन्ड
 सॅनिटायझर खरेदी करणे टाळावे.

अल्कोहोल हॅन्ड सॅनिटायझरमध्ये 65 टक्के, इति अल्कोहोलचा समावेश असतो. अल्कोहोल मधील काही घटकांचा त्वचेवर परिणाम होतो. शाळेत हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करून काही मुले हातांनी पाणी पितात. त्यामुळे सॅनिटायझरमद्ये  वापरलेली विषारी घटक मुलांच्या पोटात जातात. तसेच हुंगल्याने हे विषारी द्रव्य पोटात जाते. तसेच अनेक सॅनिटायझरमदे आयसोप्रोपेल अल्कोहोलचा समावेश असतो. हे केमिकल मेंदूला हानिकारक आहे.

फ्रॅगन्स हॅन्ड सॅनिटायझरला सुगंधी बनविण्यासाठी सुवासिक केमिकलचा वापर केला जातो. हे फ्रॅगन्स केमिकल शरीराला आणि त्वचेला अपायकारक आहे. वरवर सुगंधी वाटणारे सॅनिटायझर हे आरोग्याला धोकादायक ठरते. हे केमिकल श्वसनावाटे किंवा पदार्थातून पोटात गेल्यावर त्यापासून संसर्ग होण्याची शक्यता असते .

अँटिबायोटिक रेझिस्टन्स काही हॅन्ड सॅनिटायझर आणि त्यासारके उत्पादने ही जंतूची वार करतात म्हणजेच अँटिबायोटिकला थोपवून धरतात. जर यानंतरही आपल्याला सॅनिटायझरचा वापर करायचा असेल तर त्यावर अँटीबॅक्टिरियलचे लेबल असावे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट