मुलांच्या व्यसनात वाढ होतेय Children's addiction is increasing in marathi
![]() |
Addiction is increasing |
आज मुले असुरक्षित आहेत तरुणांमध्ये मादक पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण वाढतच आहे या प्रमाणामध्ये वाढ होण्याबाबत तरुण वैद्यकीय सल्ला किंवा किंवा उपचाराकडे कानाडोळा करत आहेत. 16 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांना मादक पदार्थांचे व्यसन असून ज्याप्रमाणे दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या शहर निहाय माहितीनुसार समोर आले की 2014 मध्ये देशात नाकट्रीक ड्रुग्स अँड सायकट्रॉपीक सबस्टन्सेस अक्ट अंतर्गत 19784 केसेसची नोंद झाली. यामधून मुंबई शहरामध्ये मादक पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 15 ते 19 वर्षे वयोगटातील 28.6 टक्के मुलांना तंबाखू खाण्याचे आणि पंधरा टक्के मुलांना मध्यपान करण्याचे मशीन असलेले दिसून आले. 15 ते 19 वर्षे वयोगटातील 5.5 टक्के मुलींना तंबाखू खाण्याचे आणि चार टक्के मुलींना मद्यपान व्यसन असल्याचे दिसून आले.
सामाजिक संबंधांचा अभाव, वेगळेपणाची भावना आणि सपोर्ट सिस्टिमचे अपयश हे याकरिता कारणीभूत घटक आहेत. कामात व्यस्त असलेले किंवा विभक्त पालकांची कॉलेजला जाणारी मुले, तसेच व्यक्तीमत्व डिसऑर्डर असलेली किशोरवयीन मुले सर्वात असुरक्षित आहेत. तसेच तणावग्रस्त जीवन जैविक दुर्बलता, अनुवंशिक आजार व मानसिक आजारापासून पीडित मुलांनासुद्धा असुरक्षिततेचा उच्च धोका आहे. सामान्यपणे दिसण्यात येणारे मादक पदार्थ आहेत दारू तंबाखू व भांग, ड्रग्स इंजेक्टेबल पदार्थ. अनेक जण कोकेन व अफूचे सुद्धा सेवन करतात. काहीजण सहकाऱ्यांमध्ये इम्प्रेसन पाडण्यासाठी या पदार्थांचे सेवन करण्याचा त्न करतात.
मानसोपचार तज्ज्ञांच्या एका समितीने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे की, मुंबईतील बहुतेक किशोरवयीन मुले वाईट मित्रांच्या सोबतीमुळे मादक पदार्थाचे सेवन करत आहेत. पाहणीत सहाभागी झालेल्यांनि सांगितले की सहकाऱ्यांच्या दबाव आणि तणाव, तसेच या पदार्थांबाबत असलेली कुतूहलता व नैराश्यमुळे मादक पदार्थाचे व्यसन करण्यास सुरुवात होते. समाजात आपली प्रतिष्ठा दाखविण्याकरिता व्यसनाला सुरुवात होते आणि हळूहळू या मादक पदार्थांची सवय होऊन जाते.
मादक पदार्थ सहजपणे उपलब्ध होणे, योग्य प्रतिबंधाचा अभाव, कायद्याच्या अंमलबजावनीचा अभाव आणि आर्थिक उपलब्धता ह्यादेखील समस्या आहेत. त्यामुळे तरुणांना मादक पदार्थाचे व्यसन लागण्याची शक्यता वाढू शकते. शांत शांत असणारी किंवा समाजापासून दूर राहणारी मुले समाजापासून दूर राहणारी मुले सहजपणे व्यसनदीन होऊ शकतात.
आजच्या किशोरवयीन पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्यात पालकांचा पाठिंबा चा महत्त्वाचा रोल आहे आणि मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याबाबतीत आपले मुले मादक पदार्थांच्या आहारी गेल्याच्या संशय असेल तर त्वरित वैदकीय मदत घेतली पाहिजे .
आणि मुलांना मदत करण्याकरता सामाजिक पाठिंबा देखील वाढविला पाहिज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा