चिकनगुन्यावरील दुखण्याचे उपाय

चिकनगुन्यावरील उपाय
चिकनगुन्यावरील  उपाय

मागच्या लेखात आपण चिकनगुण्यावरचे लक्षण बघितली तर आज आपण त्यावरील उपाय बघणार  आहोत. पहिला मुद्धा प्रतिबंधाचा. हा आजार डासांमुळे होत असल्यामुळे आपल्या परिसरात डासांना वाढायला अनुकूल वातावरण कटाक्षानं टाळावा. या संदर्भात महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, वेळोवेळी सूचना देत असतात आणि फवारणी देकील करत असतात. या वरती डास होत असतील, तर घरच्या खिडक्यांना जाळ्या बसवणं आणि रात्री मच्छरदाणीचा वापर करण हे उपाय करावे. 

         हा आजार झालाच तर सुरवातीला तातडीने करावयाचे उपाय खालीलप्रमाणे.

         फॅमिली डॉक्टर कडून ताप आणि संदिशूल यासाठी  औषध आणावा. डॉक्टरकडे जाता येत नसेल तर महासुदर्शन काढा आणि दशमुलारिष्ट 4/4 चमचे घेणं. त्यात तोड पाणी घालावा . डॉक्टरकडे जायची क्षमता येईपर्यंतच हा उपाय घ्यावा.

      भूक तितकाच हलका आहार घ्यावा. भूक नसल्यास भाजलेल्या तांदळाची पेज, मुगाचा सूप असा हलका आहार घ्यावा . दिवसातून तीन वेळा गरम पाण्याच्या पिशवीचा/तव्यावर फडका ठेवून शेक घ्यावा.

        नागरमोटा, सुंठ, चंदन, वाळा, आणि पित्तपाडा या औषधांनी सिद्ध केलेला ( हि औषध घालून उकळलेला )  पाणी प्यावं.
        गरम कपडे वापरावेत .
        सांध्यांना शक्यतो औषध लावू  नये . त्यांनी पुरळ वाढण्याची भीती असते .

       लाह्या, डाळीचा काढणं, भाजलेल्या तांदळाची खिचडी, ज्वारीची ताजी भाकरी  असा हलका आहार घ्यावा. चवीला तोडी हलकी मिरपूड वापरावी .

       स्नान, दिवसा झोप, काम हे टाळून पूर्ण विश्रान्ती  घ्यावी.
     
          रात्री जागु नये.

        ताप पुरळ गेल्यावर आजाराची दीर्घकालीन चिकित्सा  सुरु होते त्यात विशेषतः सांधेदुकीवरील उपचार करावे लागतात.

        चिकनगुन्याच्या काही रुग्णांमद्ये सुरवातीला विरेचन किंवा असे शोधांपक्रम करावे लागतात. ते अर्थाचाच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे करावे लागतात . प्रत्येक रुग्णानुसार औषध बदलतात . म्हणून आपल्या मनानुसार औषध घेऊ नये . घरातल्या  एका माणसाला लिहून दिलेली औषध दुसऱ्यांनी वापरू  नयेत.

         लक्षात घ्या कि चिकनगुन्याचा आजाराचा लक्षण भयंकर असला तरी तो जीवघेणा आजार नाही. तो बरा होतोच, शिवाय सांधेदुखी हा त्याचा उपद्रवदेखील बरा होऊ शकतो गरज आहे ती फक्त योग्य वेळी डॉक्टरकडे जाण्याची  आणि त्यांच्याकडे पूर्ण काळ ट्रीटमेंट करून घेण्याची.
      

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट