उंची कमी आहे





उंची न वाढण्याची कारणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकतात व त्यावरील उपाय वेगवेगळे असतात. पुरेशी उंची न वाढल्यास उंची न वाढण्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे व योग्य औषधोपचार करून आपली उंची नैसर्गिक पद्धतीने वाढवता येते.

        आपले व्यक्तिमत्त्व वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. माणसाचे शिक्षण, बुद्धिमत्ता, वक्तृत्व यांचे इतकेच महत्त्व असते ते म्हणजे व्यक्तिमत्त्व. सुंदर चेहरा, केशरचना वर्ण या गोष्टी व्यक्तिमत्त्व खुलण्यात आवश्यक असतात. पण याच्या जोडीलाच महत्त्वाचे असते म्हणजे व्यक्तीची "उंची" वेगवेगळ्या नोकरीच्या क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ पोलिस, सैन्य, मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात विशिष्ट प्रमाणातील उंची हा महत्त्वाचा निकष मानला जातो. काही वेळा शैक्षणिक पात्रता इत्यादी गोष्टी असूनही उंची कमी असल्यामुळे नोकरी भेटत नाहीत. काही मुलींमध्ये उंची कमी असल्यामुळे लग्न ठरवण्यात अडचणी येतात. वय जास्त झाले तर यावर उपाय होऊ शकत नाही म्हणून वयाच्या तुलनेत उंची वाढत नसेल तर वेळ न घालवता तज्ज्ञांच्या मदतीने उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

          उंची कमी असण्याची कारणे प्रत्येक व्यक्तीत थोडीशी वेगवेगळी असतात त्यामुळे यांवरील उपचारही प्रत्येकात थोडेसे भिन्न स्वरूपाचे असल्याने उंची वाढणारे एकच औषध उपलब्ध नाही. पण उंची पुरेशी वाढत नसल्यास उंची न वाढण्याचा कारणांचा शोध घेऊन अशी कारणे औषधाच्या साहाय्याने  दूर करून उंची वाढण्याचे नैसर्गिक क्रिया पूर्ववत करता येते तसेच याच्या जोडीला शरीरातील अस्थिधातू, मांसधातूचे बल वाढविणारे आयुर्वेदिक औषधे आणि विशिष्ट असा आहार व नियमित व्यायाम या चारही गोष्टींचा उपयोग करून उंची वाढविता येऊ शकते.

         उंची कोणत्या वयात वाढू शकते?
         मुलांमध्ये वयाच्या 18 ते 19 वर्षांपर्यंत आणि मुलींमध्ये सतरा ते अठरा वर्षांपर्यंत उंची वाढू शकते. त्यामुळे साधारणपणे वयाचे 14-17 वर्षापर्यंत उंची वाढण्यासाठी उपचार करता येतात. आई-वडील बुटके असतील म्हणजेच उंची कमी राहण्याची अनुवंशिकता शक्यता असेल अशा वेळी थोडे आधीच म्हणजे वयाच्या 12 ते 14 व्या काळात उपचार घेणे फायद्याचे असते. अर्थात यामध्ये औषधी उपचार तीन-चार महिने द्यावी लागतात व त्यानंतर फक्त व्यायाम आणि आहारातील काही गोष्टी खाणे एवढे केले तरी फायदा होतो. अर्थात या गोष्टीमध्ये नियमितपणाला खूप महत्त्व आहे. तसेच विशिष्ट काळात किती उंची वाढेल हे देखील निश्चित सांगता येत नाही प्रत्येकाला लागणारा वेळ हा भिन्न असतो.

          उंची वाढविण्यासाठी उपयुक्त औषधं आयुर्वेदातील, कोरफड, अश्वगंधा, शतावरी, आवळा कोहळा, वाकेरी, लाशा या वनस्पतीपासून आणि मासिक भस्म अशी वेगवेगळी औषध रुग्णांचे वय, प्रकृती, कोटा  इत्यादींचा विचार करून वापरावी लागतात.

        उंची वाढविण्यासाठी आहार आहारातील मूग, मसूर, उडीद ही कडधान्ये पालेभाज्या केळी, डाळिंब सफरचंद, अंजीर, आवळा, केळी खजूर बदाम दुध तूप, खसखस, गाजर, बीट या पदार्थांचा नियमित वापर उंची वाढवण्यास मदत करतो.

        व्यायाम उंची वाढवण्यासाठी रोज सूर्यनमस्कार, पोहणे, उंच उड्या, दोरीच्या उड्या, पळणे, ताडासन ह्यापैकी शक्‍य असणारे व्यायाम योग्य प्रकारे करावे. तसेच या जोडीला शतावरी बला इत्यादीपासून बनवलेले बलवर्धन तेल सगळ्या अंगाला मसाज करावे . वरील पद्धतीने औषधे आहार व व्यायाम या त्रिसुती आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास उंची निश्चित वाढू शकते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट