केस पांढरे का होतात. Why the hair becomes white in marathi



hair becomes white
Hair becomes white

आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे बहुतेक जणांचे केस पांढरे झालेले दिसून येतात. पूर्वीच्या काळात वयोमानानुसार केस पांढरे होत असत. पण आता 20 ते 30 वयोगटातील तरुण वर्गातही केस पांढरे झालेले दिसून येतात

          आपले केस काळे राहण्यास मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य कारणीभूत असता. आपल्या केसांच्या मुळाशी हे रंगद्रव्य विशेष पेशी तयार करत असतात .
आपल्या डोक्याच्या टाळुवर एक मिलीमीटर भागात या पेशी 1000 ते 2000 एवढ्या संक्येने पसरलेले  असतात . वयोमानानुसार या पेशींचे समूह कमी कमी होत जातात त्यामुळे केस राखाडी दिसतात व कालांतराने पांढरे होतात.
             या रंगद्रव्याचे कमी होण्याची अनेक करणे असतात या कारणांमुळेच केस लवकर किंवा उशिरा पांढरे होतात.

1 अनुवंशिकता :  तुमचे केस कुठल्या वयात पांढरे होणार, हे आनुवंशिकतेमुळे ठरते. साहजिकच  कुणाला विशीतच हा अनुभव येऊ शकतो, तर काही जणांचे केस पन्नाशीतही काळेकुळकुळीत राहू शकतात.

2 पोषण आणि आहार :  आहारामद्ये प्रथिने आणि इतर महत्वाचे जीवनसत्वे, तांबे आणि आयोडीन  अशी खनिजे कमी प्रमाणात असल्यास मेलॅनिन बनणारे पेशी समूह नष्ट होऊ लागतात. त्यामुळे केस पांढरे होऊ शकतात

3 संप्रेरके  : एसीतिएच, थायरॉईडसारकी काही संप्रेरके मेलॅनिन पेशींना कार्यरत ठेवत असतात .या पेशींचा अभाव झाल्यावर केस पांढरे होणारच. लहान मुलांमद्ये हे कारण आदळून येऊ शकते.

4 काही आजार आणि विकार : पांढरे कोड, वारेंनबर्ग अश्या आजारांमद्ये केस पांढरे होतात.
ब-12  जीवनसत्वाचा अभाव असल्यामुळे केस पांढरे होऊ शकतात. केसात होणारा कोंडा,बद्धकोष्ठतां, सतत होणारी होणारी सर्दी सततचीं डोकेदुकी ही कारणे सुद्धा या श्वेतकेसांच्या  प्रश्नाच्या मुळाशी असू शकतात .

5 तांणतणाव : आजच्या जीवनातला ताणतणाव  हे एक प्रमुख कारण पांढऱ्या केसांच्या वाढत्या जनसंख्येत आढळते .

रासायनिक पदार्थ : केसांची तेले, क्रीम्स, हेअरस्प्रे, साबण, शॅम्पू या मधील रासायनिक पदार्थांमुळे केस पांढरे होंऊ शकतात.

ऍलर्जी  : काही रासायनिक वस्तूंचा टाळूला  आणि केसांच्या मुळाना होणान्या अलर्जीमुळें केसांचा रंग  पालटतो .

८. व्यसने : मद्यप्राशन धूम्रपान ही व्यसने अनेक आजारांना कारणीभूत असतात केस पांढरे होण्यात सुद्धा त्यांचा हातभार असतो .

अस्वच्छता : केसाची निगा ना राखणे हे केस पांढरे  होण्यामागचं  मोटे कारण आहे .वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे केसांची निगा राखणे गरजेचे झाले आहे.

१० निद्रानाश : कोणत्याही कारणाने झोप नियमित ना मिळणे, सततची जागरणे, निद्रानाश अश्या कारणांचा  समावेश ह्यात  करावा लागेल.
          रक्तातील कोलेस्टरचे प्रमाण खूप वाढत गेल्यास रक्तवाहिनीच्या मुळांशी त्यांचे थर जमा होऊ लागतात. त्यामुळे केस अकाली  किंवा लवकर पांढरे होऊ शकतात.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट