केस काळे राहण्यासाठी उपाय Remedies for keeping hair black in marathi
![]() |
keeping hair black |
आधीच्या लेखात केस पांढरे होण्याची लक्षणे बघितली तर या लेखात आपण त्यावरील उपाय बघणार आहोत . 'ऑक्सिडेटिव्ह 'स्ट्रेस या प्रक्रियेमुळे केस पांढरे होतात . त्यामुळे केसांच्या मुळांनाही आघात पोहचतो. जसे जसे वय वाढत जाते तसे तसे केसांच्या मुळाशी हायड्रोजन पेराक्सओईड जमा होतो. याचा थर ब्लीचप्रमाणे असतो. त्यामुळे केसांचा रंग बदलतो.
यावर उपाय म्हणून ब्रिटनचे ब्रॅडफोर्ड विद्यापीठ आणि जर्मनीतील ग्रीप्सवाल्ड विद्यापटातील प्रोफेसर कॅरीन आणि सहकारी शास्त्रन्यांनी असे शोधून काडले आहे कि ज्यायोगे हा थर हटवला जातो हा थर दूर झाला कि पुन्हा केस पांढरे होण्याची प्रक्रिया होत नाही. मॉडिफायड सुडो केटेलेसिस असे या उपचाराचे नाव आहे .
प्रतिबंदक उपाय : एकदा केस पांढरे झाले कि पुन्हा पांढरे होत नाहीत. केसकल्प किंवा डाय केल्याशिवाय त्यांचा रंग बदलत नाही . त्यामुळे अनुवंशिकता सोडल्यास इतर गोष्टींची काळजी घेतल्यास केसांचा रंग राखण्यास मदत होईल .
दिनचर्येत बदल : रोजच्या कार्यात नियमतता, आठवड्यातून तीन वेळा केस धुणे, समतोल आहार पुरेसा व्यायाम आणि पुरेशी झोप यांची गरज असते .
केस काळे राहण्यासाठी शरीलाला व्हिटॅमिन ए बी सि डी इ . कॅल्शिअम आयोडिन, फॉस्फरस खनिजे, क्षार, लोह, तांबे असे पदार्थ शरीलाला मिळाले पाहिजे .ब जीवनसत्व असलेले , फोलीक असिड हे घटक केस काळे राहण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालेभाज्या, ताजी फळे, असायलाच हवीत .
काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे
एकाद केस पांढरा दिसत असेल तरी तो तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागतात.
केस काही प्रमाणात पांढरे असतील तर डाय करू नका त्यामुळे काळ्या केसांवरही परिणाम होतो आणि केस पांढरे होतात .
केस धुण्यासाठी साबण किंवा शॅम्पुऐवजी आवळा, शिकेकाई, बेसन, या घरगुती पर्यायांचा उपयोग करू शकता.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा .
केसांसाठी हेअर ड्रायर चा वापर कमीत कमी करावा .
केस काळे करण्यासाठी भोंदू व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यापेक्षा योग्य ता डॉक्टरांचा सल्ला घेणे.
केसांकरता मेंदीच्या वापराचे अनेक फायदे आहेत . मेंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी , ती नियमित वापराने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान चकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात ज्यांना कंडिशनर असे म्हणतात.
डोक्यात कोंडा होण्याचा थांबतो आणि केसांची वाढ होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा