शॉवरबाथ घेताना होणाऱ्या चुका



शॉवरबाथ घेताना होणाऱ्या चुका





शॉवरने स्नान करणे ही बाब आता नवीन राहिलेली नाही. ज्या ठिकाणी पाण्याचा अभाव असेल आणि तेथे बादलीभर पाणी मिळणे कठीण असेल अश्या ठिकाणी शॉवरने अंघोळ करण्याचा विचार हास्यास्पद ठरेल. मात्र, महानगरात सर्वच बंगले, फ्लॅटमध्ये शॉवरची सुविधा असते. अनेक ठिकाणी 24 तास पाण्याची सोय असल्याने तेथील लोक शॉवरने अंघोळ करण्यास प्राधान्य देतात. कारण अंघोळीसाठी पाणी साठवून ठेवण्याची गरज भासत नाही आणि शॉवरच्या स्नानाने संपूर्ण अंग भिजते तांब्याने अंघोळ करताना संपूर्ण शरीर चांगल्या रीतीने भीजेलाच याची खात्री देता येत नाही. आजच्या घडीला शॉवरबाथ साधारण बाब बनली असली तरी काही नजरचुकीने होणाऱ्या चुकांमुळे अपघात होण्याची शक्यता असते.



अति गरम पाण्याने स्नान काहींना अति गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. शॉवरने अंगावर सतत गरम पाणी पडल्यास त्वचा भाजते आणि शुष्क होते. अंघोळ झाल्यावर शरीरावर लाल रंगाचे पुरळ येतात आणि रेषेश उमटण्याचा धोका असतो . त्वचा जर नाजूक असेल, तर त्यास इजा होते. गरम पाण्यामुळे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि त्याचे परिणाम त्वचेवर होतात. त्यामुळे त्यामुळे थंड आणि गरम पाण्याचे योग्य मिश्रण झाल्याची खातरजमा झाल्यावरच शॉवरखाली स्नान करावे.

अधिक काळ स्नान करणे स्नान किती वेळ करावे,  याचे माहिती सर्वांनाच असेलच असे नाही. मात्र किमान दहा मिनिटात स्नान करणे अपेक्षित आहे मात्र बरीच मंडळी 15 ते 20 मिनिटे शॉवरखाली अंघोळ करत असतात अशा स्थितीत सतत गरम पाणी पडत असल्याने त्वचेवर ओलावा किंवा आद्रता निघून जाते व परिणामी स्नानानंतर त्वचा कोरडी पडते अनेकांना गैरसमज आहे की अधिक काळ स्नान केल्याने आपण अधिक ताजेतवाने, फ्रेश राहू परंतु त्याचा विपरीत परिणाम त्वचेवर होत असतो.

नेहमी जेल किंवा बॉडीवॉश चा वापर  त्वचा नितळ आणि चकचकीत रहावी यासाठी काही जण नियमितपणे तेल आणि बॉडी वॉश चा वापर करतात परंतु अशा प्रकारची कृती ही त्वचेला मारक ठरते त्वचेवर नैसर्गिक चमक असताना त्यावर पुन्हा जेलचा   मारा केला तर त्वचा खराब होण्याची आणि काळवंडते भीती असते. यामुळे त्वचा कोरडी आणि खरखरीत होते. त्यामुळे दररोज जेल किंवा बॉडी लोशनचा वापर करण्याची गरज नाही त्वचेवरचे विषाणू विषाणू मारण्यासाठी प्रत्येकवेळी लोशन  लावण्याची गरज नाही. साधा साबणने देखील विषाणू निघून जातात. काही लोशन मध्ये केमिकल्स भरपूर वापर होत असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो.

जुन्या आणि ओल्या स्पंजचा वापर   त्वचा स्वच्छ राहण्यासाठी स्पंजचा वापर योग्य ठरतो. परंतु स्पंज   वेळोवेळी बदलण्याची गरज आहे. जर आपण महिनोंमहिने एकाच स्पंज वापरला तर त्यापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. शरीराला खाजही सुटते. तसेच प्रत्येकाने स्पंज वेगळा वापरावा . एकाच स्पंजचा वापर सर्वांनी करणे टाळले पाहिजेत तसेच अंग पुसण्यासाठी टर्किश टॉवेल्सचा वापर करणे फायद्याचे ठरते.

अंग जोरात पुसू नका  अंघोळ झाल्यानंतर अनेक जण अंग जोरात पुसतात त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. चांगल्या आणि मुलायम टॉवेलने अंग हळू पुसावे जेणेकरून त्वचेला इजा होणार नाही. खडबडीत किंवा जाड टॉवेलने अंग पुसू नये . टॉवेल कोरडा आणि वाळलेला आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी. टॉवेल जर ओलाच असेल तर अंग योग्यरीत्या पुसले जाणार नाही परिणामी त्वचेवर ओलावा राहून खाज सुटू शकते. तसेच अंग ओले असताना कपडे घालण्याचे टाळावे काही मंडळी  डोके न पुसता, अंग स्वच्छ न करताच कपडे घालतात. त्यामुळे अंगावर रॅशेस येऊ शकतात.


  

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट