विदेशी फूड आणि देशी फूड Foreign food and native food
![]() |
Foreign food and native food
|
वाढती धावपळ, व्यस्त दिनक्रम यांच्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. आरोग्याशी निगडित अनेक छोट्या मोठया समस्या भेडसावत असतात. त्यापासून सुटका करण्यासाठी विविध उपाय लोक शोधत असतात. कारण हल्ली लोकांमध्ये त्याविषयी जागरूकता वाढली आहे.
आहारात विविध परदेशी पदार्थही सामील केले जातात. त्यात ऑलिव्ह, क्विनोआ, ओट्स, अकाई बेरी, गोजी बेरी, केलची पाने पदार्थांचा समावेश केला जातो. अर्थात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी चांगल्या असतात असे आपण म्हणतो. मात्र सर्वच पदार्थांचा भारतीय आहारात सुरवातीपासून समावेश होता. या सर्व पदार्थांचे फायदे आपल्या आजी-आजोबांनी सांगितले होतेच. मात्र परदेशातून आलेल्या ते चांगलेच असणार अशी होती झाल्याने त्याकडे कानाडोळा केला गेला . या सर्व परदेशी पदार्थांच्या तुलनेत सहजपणे आणि कमीत कमी किमतीत उपलब्द होणारे, भरपूर फायदा पोचावणाऱ्या देशी पदार्थांकडे कानाडोळा करतो.
तुळशीचे बी आणि सब्जाचे बी तुळशीचे बी आणि सब्जाचे बी हे दिसायला एकसारखे असते. सब्जा बी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. अंडे खाण्याइतकेच ते फायदेशीर आहे. तर तुळशीच्या बी मधे जीवनसत्व लोह इत्यादी पोषकतत्त्व असतात. त्यामुळे शरीरातील रक्तशर्करा पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्याशिवाय तुळशीचे बी पोटासाठी उत्तम असते. बद्धकोष्ठता आणि फ्लू कमी करण्यासाठी हे बी उपयोगी असते. तुळशीचे आणि सब्जा दोन्ही बी चे सेवन करण्यापूर्वी भिजवणे आवश्यक असते. हि दोनी बी बाजारात सहजपणे उपलब्द आहेत.
आवळा आणि अकाई बेरी अकाई बेरी हे परदेशी फळ आहे. त्या तुलनेत आवळा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतो. अकाई बेरी अँटीएजिंग आणि वजन कमी करणे यासाठी उपयुक्त आहे. तर आपल्याकडील आवळा फळात सी जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप अधिक आहे. तसेच त्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे आणि वयोवृद्धी रोखण्याचे गुणही आहेत. आवळा अत्यंत माफक दरात मिळतो. आवळ्याचा मुरंबा, चावनप्राश , आवळा कॅंडी आणि आवळा रस इतक्या प्रकारे सेवन केले जाते.
भारतीय तेल आणि ऑलिव्ह ऑईल हल्ली ऑलिव्ह ऑइलमध्ये स्वयंपाक करण्याचे प्रमाण वाढले आहेत. शेंगदाना, नारळ मोहिरी यांच्या तेलापेक्षा ऑलिव्ह तेल आला पसंती दिली जात आहे . अर्थात ऑलिव्ह प्रचंड महाग असल्याने प्रत्येकजण त्याचे सेवन करू शकत नाही हेदेखील खरे आहे मात्र शेंगदाना नारळ, मोहिरी या सर्व तेलांमद्येंही आरोग्यकारी गुण आहेतच. नारळाचे तेल वाईट कोलेस्टेरॉलचे रूपांतर चांगल्या कॉलेजमध्ये करते. मोहिरीच्या तेलात खनिजांचे प्रमाण भरपूर असते. आणि शेंगदाण्याच्या तेलात इ जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असते. मुख्य म्हणजे ही सर्व तेले माफक दरात आणि सहजपणे उपलब्ध असतात.
अश्वगंधा आणि चिनी जिन्सेग आशिया खंडातील शेजारी देश असलेल्या चिनीमद्ये जिन्सेग नावाच्या झाडाचा वापर लगिक समस्या निवारणासाठी केला जातो . पण हि औषधे भारतात मिळणे कठीण आहे पण त्यावेळी भारतात उपलब्ध असलेले अश्वगंधा ही वनऔषधी लैंगिक समस्या निवारण उपयुक्त आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये कित्तेक वर्षांपासुन अश्वगंधा वापरले जाते. चीनी औषधे तुलनेत अश्वगंधा नकीच स्वस्त आहे.
जांभूळ आणि गोजी बेरी आशिया खंडात हि दोनी फळे मिळतात. हे फळे मधुमेहाच्या रोग्यांसाठी फायदेशीर असतात. गोजी बेरी हे फळ चीनमध्ये मिळते तेच जांभूळ हे भारतीय फळ आहे. घसा दुखणे थकवा घालवणे, प्रतिकार शक्ती वाढविणे. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम जांभूळ करते. त्याशिवाय कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. जांभूळ मोसमी फळे असल्याने या मोसमात सहजपणे उपलब्ध होते.
बीट आणि केळीची पाने केळीच्या पानांचा सलाडमध्ये वापर वाढताना दिसतोय . केळ्याच्या पानात पोषक घटक असतात. तसेच ए आणि के जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप जास्त असते. मात्र केळीच्या पानाच्या जागी बीटाची हिरवी पाने वापरली जाऊ शकतात. आपल्याकडे बहुतांश वेळेला बीटरुटचे सलाडमद्ये सेवन केले जाते. मात्र बीटचे पान हे विविध पोषक तत्व आणि लोह यांचा उत्तम स्रोत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा