सीताफळाचे दहा फायदे Ten benefits of custurd apple in marathi
![]() |
ten benifit of custurd apple |
गोड आणि रुचकर फळांपैकी सीताफळ एक फळ आहे. सिताफळामध्ये ए, बी2, सी जीवनसत्वांबरोबरच कॅल्शियमही भरपूर आहे. याशिवाय सीताफळांमध्ये काही औषधी गुण आहेत. मोसमी फळ असलेले सीताफळ हिवाळ्यात येते. तसे रोज सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
कस्टर्ड ऍपल एक गोड फळ आहे, जे जगभरात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते फळ 3 ते 6 इंच (8-16 सें.मी.) व्यासाचा परिमाण असलेल्या स्वरूपाचे आहे.
कस्टर्ड ॲपलच्या त्वचेचे आच्छादन पातळ पण कठीण असते जे पिकलेले असताना पिवळा किंवा तपकिरी रंगाचे असते. पातळ आच्छादन खाली कस्टर्ड सारख्या जाड पांढऱ्या क्रिम असते जी बीभोवती फिरलेली असते.
हिवाळ्यात काही फळांचा मोसम असतो. त्यातील सीताफळ हे देखील मोठ्या प्रमाणात येते. सिताफळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात. सिताफळा खाल्याने होणारे 10 फायदे जाणून घेऊया.
कर्करोग अँटीऑक्सीडेंट गुणांनी युक्त सीताफळ शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून बचाव करते. त्यामुळे कर्करोग सारख्या रोगांपासून बचाव होतो.
स्थूलपणा सीताफळतील नैसर्गिक साखरेत कॅलरीज असतात. परंतु त्यामुळे मेटाबॉलिजम वाढते. त्यामुळे भूक नियंत्रण राहते आणि वजन कमी होते.
रक्ताल्पता सीताफळात लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्ताची गुठळी होतेच त्याचबरोबर रक्ताची कमतरता ही पूर्ण होते.
मजबूत हाडे रोज सीताफळ खाल्ल्याने त्यातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांना मजबुत करून गुडघेदुखी, सांधेदुखी दूर करण्यास मदत होते.
गर्भवती गर्भवती स्त्रियांनी सीताफळाचे सेवन अवश्य करावे त्यामुळे भ्रूणाचा विकास तर होतोच पण गर्भवती स्त्रीयांची हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राहते.
दृष्टी सुधारण्यासाठी सीताफळ रोज खाल्ल्यास नजर तेज होते त्याशिवाय चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते . त्याशिवाय सीताफळ खाल्ल्याने तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते.
मधुमेह सीताफळातील कमी उष्मांक आणि हायपर ग्लेसेमिक गुणांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
तोंडाचे आजार सिताफळाच्या सालाने रोज सकाळी दात घासल्यास तोंड तोंडातुन रक्त येणे, दाताचे किडने सुज आणि तोंडाच्या दुर्गंध समस्या दूर होतात.
हृदयरोग सोडियम आणि पोटॅशियम चे प्रमाण सिताफळामध्ये भरपूर असते त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते आणि हृदयविकारापासून सुटका होते.
पचनक्रिया आतडयातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकून पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करते. त्यामुळे छातीत जळजळ पित्त, तोडाची साले निघणे आणि पोटात वायू होणे किंवा गॅस होणे आदी तक्रारी दूर होण्यास मदत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा