मुकाबला पोटातील अल्सरचा Combat ulcers in marathi
![]() |
पोटाचा अल्सर झालेल्या व्यक्तींवर यशस्वी उपचार होऊ शकतात. अल्सरवर सुरू असलेल्या उपचारांना पूरक म्हणून स्वतःच काही सोप्या मार्गाचा अवलंब करू शकतो ज्याचा उपयोग अल्सर बरा करण्यासाठी होऊ शकतो. तसेच भविष्यात पुन्हा अल्सर होऊ नये यासाठी प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते.
पोटातील अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर असेही म्हणतात. पोटातील अंतत्वचेला फोड आलेले असतात. पोट आणि लहान आतड्यांमध्ये संरक्षित म्युकस असते, ज्यामुळे अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आम्लामुळे होणाऱ्या पोटाच्या झीजपासून संरक्षण होते. पोटाचा हा म्युकसचा थर जेव्हा कमजोर होतो किंवा झिजतो आणि आम्लाच्या संपर्कात आल्याने पेशींची झीज होते तेव्हा अल्सर झाला असे म्हणतात.
वेदनाशामक औषधांच्या अतिवापरामुळे अल्सरची समस्या निर्माण होऊ शकते. अस्पिरीन आयबुफ्रेम यासारख्या स्टेरॉईड विहरीत वेदनाशामक गोळ्यांचा अतिसेवनाने हिटलरच्या समस्या उद्भवू शकते.
सर्वसाधारणपणे पूर्वलक्षणे अपचन किंवा छातीतील जळजळ, पोटदुखी, पोटात दुखणे किंवा जळजळ, काही टोचल्यासारखे खुपल्यासारखे दुखणे, सतत भूक लागणे किंवा खाल्यावर पोटदुखी थांबणे. नॉशिया, उलटी होणे, पोट डब्ब होणे, सतत पित्तशामक गोळ्या खाव्या लागणे.
घरगुती औषधे अल्सरचे निदान झाले असेल किंवा काही वर्षांपासून अल्सरचा त्रास असल्यास काही घरगुती औषधे उपयोगी पडू शकतात. जोडीला काही पदार्थांचे सेवन टाळण्याचे पथ्य पाळावे लागेल.
अँटासिड टाळा अँटासिड किंवा पित्तशामक गोळ्या घेतल्याने काहीवेळ पोटाला बरे वाटते. पण सातत्याने अशा गोळ्या घेणे टाळले पाहिजे कारण त्या पोटातील अल्सर बरा करू शकत नाहीत. उलट त्या अल्सर बरा करू शकणाऱ्या औषधांच्या कार्यात अडथळा ठरू शकतात. प्रतिजैविकांचा प्रभाव ह्यामुळे कमी होऊ शकतो.
पोटाची स्थिती तळलेले मसालेदार पदार्थ सातत्याने आहारात असणे हे अल्सरला कारणीभूत होण्यास जबाबदार असतात. त्यामुळे अल्सर होऊ शकतो किंवा किंवा भविष्यात विकसित होऊ शकतो. अर्थात ज्यांना आधीपासून अल्सर झालाय त्यांनाही या पदार्थाचा त्रास होऊ शकतो. समजा एखाद्या वेळी मसालेदार जेवण केल्यानंतर पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या तर मसालेदार पदार्थांमुळेच हे झाले हे ओळखा. कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर जर अस्वस्थता येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
आहार थोडाच घ्या पारंपारिक आहाराच्या सवयीत तीन वेळा जेवणे हि महत्त्वाची सवय आहे. पण काही लोकांसाठी मात्र पचनाचे दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. सतत काही वेळाने थोडा थोडा आहार घेतल्यास एन्झाईपची सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर होतात.
केळे खा केळ्यामध्ये जंतुविरोधी घटक असतात. त्यामुळे केळं खाल्ल्यास अल्सरला कारणीभूत असलेल्या एच पायलोरीची वाढ रोखली जाते. मध्यंतरी काही अभ्यासकालीन प्राण्यांना केळी खाऊ घातले होते. तेव्हा त्याच्या पोटाची अंतत्व चा अधिक जाड झाली आणि पचनासाठी आवश्यक आम्लं, पोटाच्या आतील त्वचा थर यांच्यात अडथळा करणाऱ्या म्युकसचे उत्पादनही वाढल्याचे दिसून आले होते. त्यामुळे केळे सेवन करणे नक्कीच उपयोगी पडू शकते.
काय खावे कोबीवर्गीय भाज्या, हळद, मध, लसूण ज्येष्ठमध, कोरफड.
काय खाणे टाळावे काळीमिरी, कॉफी, चॉकलेट आणि कोका, लिंबूवर्गीय फळे, तळलेले पदार्थ, दुध.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा