तुपाचे सेवन आणि आरोग्य Health benefits of ghee in marathi
![]() |
benefits of ghee |
भारतात तुपाचे सेवन पूर्वीपासून केले जाते. आयुर्वेदात तुपाच्या सेवनाचे महत्त्व आवर्जून सांगितले आहेत. आजच्या घडीला केवळ भारतच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि बहुतेक देशांच्या भोजनात त्याचा समावेश केला जातो.
तुप विविध पोषक तत्वांनी युक्त आहे. तो एका संतुलित आहाराचा भाग मानला आहे. तुपामध्ये अ, क, ड, के जीवनसत्वांनी युक्त आहे. तुपाच्या फायद्यांविषयी आपण खाली जाणून घेवूया.
पचनशक्ती सुधारणा तुमची पचनशक्ती जितकी चांगले तितके तुमचे आरोग्य चांगले असते. तेलामुळे पचनशक्ती चे काम काहीसे कमकुवत होऊ शकते. परंतु साजूक तूप पचनशक्तीचे काम सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रात्री झोपताना गरम दुधात एक चमचा साजूक तूप घालून पिल्यास पोट साफ होते. शिजवलेल्या डाळीत तूप घालून खाल्याने गॅसचा त्रास होत नाही.
त्वचेचे पोषण त्वचा नेहमी तजेलदार ठेवायची असेल तर आहारात तुपाचा समावेश करा. साजूक तूप त्वचेचा रुक्षपणा दूर करते. केसांना तुपाने मालिश केल्यास ते काळे, मुलायम आणि चमकदार राहतात. एखादी जखम झाली असेल तर ती लवकर भरून येते.
सांधे मजबूत होतात साजूक तुपाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. तुपामुळे विविध रोगांवर लढण्याची ताकद मिळते. साजूक तुपात कर्करोगाच्या विषाणू विरुद्ध लढण्याचे गुण असतात. तूप मध्यम श्रेणीत फॅटी ऍसिडने समृद्ध असल्याने ते यकृताकडून सरळ शोषले जाते. साजूक तुपामुळे सांधे मजबूत होतात.
लहान मुलांसाठी लाभदायी मज्जासंस्थेच्या विकासासाठी तूप उपयुक्त आहे. दोन वर्षाखालील मुलांना थोडे तूप अवश्य द्यावे. तूप अ, ड, ई या फॅट सोल्युबल जीवनसत्त्वांचा मुख्य स्त्रोत आहे. तुपामुळे धमन्यांमध्ये साठलेले कॅल्शियम हटवून रक्तप्रवाह सुरळीत होतो. तुपातील जीवनसत्व लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चांगली असतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
अँटीऑक्सीडेंट साजूक रावल तुपामध्ये अ, ड जीवनसत्त्व, रायबोफ्लेविन, कॅल्शियम, मॅग्नेशियम पोटॅशियम मिळत असतात. याशिवाय त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असते. तूप अँटीऑक्सिडेंटचे काम करते. तुपाचे मर्यादित सेवन करून वजन कमी करता येते. तुपामुळे मेटाबॉलिजम चांगले झाल्यामुळे वजन आटोक्यात राहते. तुपाच्या सेवनाने रक्तप्रवाह सुधारतो. तुपामुळे चरबी वाढते हा एक मोठा गैरसमज आहे. तुपाचे प्रमाण मर्यादित असेल तर शरीराला लाभदायी असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा