मोठया आवाजाची भीती वाटते का Do you feel scared of loud noise?



 scared of loud noise?
scared of loud noise?


काही व्यक्ती मोठ्या वाजला घाबरतात, आपल्यालाही तसा त्रास होत असेल तर आपण एक ऑक्युस्टीकोफोबियाणे पिढीत आहात. भारतासारख्या देशात प्रत्येक समारंभ, सण याच्यामध्ये आवाजी उत्साह असतो. बहुतेकदा अनेक समारंभात फटाके वाजवले जातात. अश्यावेळी या आजारांच्या व्यक्तीला खूप त्रास होतो.

काय आहे हा आजार ? 
ऑक्युस्टीकोफोबिया म्हणजे मोठा आवाज, आरडाओरडा यांची भीती. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना अति आवाज किंवा आठवडा ऐकल्याने त्रास होतो. सुदैवाने, भारतात या आजारांचे प्रमाण कमी आहे.

आजाराची लक्षणे
                या आजाराने ग्रस्त व्यक्तींना मोठा आवाज ऐकला की भीती वाटते, ते थरथर कापू लागतात आणि घामही फुटतो. काहीवेळा रुग्णांला उलटी येणे, हृदयाचे ठोके वाढणे, दम लागणे, तोंड सुकणे  किंवा अस्वस्थाता येणे असेही त्रास होतात.

कशी होती सुरुवात
             जे लोक तणाव ग्रस्त आणि चिंताग्रस्त असतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एखाद्या गोष्टीचा फोबिया असण्याला काही विशेष कारण लागत नाही. विशेष घटना, लहानपणीच्या वाईट यांच्याशीही याचा संबंध असू शकतो. त्याशिवाय कुटुंबाचा वैद्यकीय पूर्व इतिहास आणि पालनपोषण यांच्या भूमिका मोठी असते. ज्या कुटुंबांमध्ये मोठा आवाज आवडत नाही अशा परिवारात वाढलेल्या व्यक्तींना गोंधळ ऐकल्यानंतर त्रास होणे सहाजिक आहे. एखादा अपघात किंवा दुर्दैवी घटना घडल्यास किंवा खूप आरडाओरडा मुळे घडलेल्या अपघातामुळे मोठी भीती मनात बसू शकते ज्या लोकांना श्रवण समस्या असते त्यांना हा आजार होऊ शकतो कारण उच्च आवाजाने ते बहिरे होतील अशी भीती त्यांना वाटतं असते.

उपचार काय आहेत 
              यावर उपचार करण्यासाठी रुग्णांना शांत करणे आवश्यक असते. उपचाराला सुरुवात करताना काही औषधे दिली जातात . त्यानंतर सिस्टेमॅटिक  डिसेंसिंटायझेशनचे  उपचार करतात. यामध्ये रुग्णाला हळू आवाज ते मोठा आवाज ऐकवला जातो त्यामुळे मोठ्या आवाजाची भीती मनातून निघून जाण्यास मदत होते . रुग्णाला वर्तणूकविषयक सायकोथेरपी चे उपचार केले जातात . या अंतर्गत रुग्णांच्या भीतीचे कारण समजावून घेऊन ते दूर करण्याचे प्रयत्न  करतात.
               आपल्या देशात बहुधा अनेक समारंभ आणि उत्सवाची सुरुवात फटाके उडवून केली जाते मात्र याकडे आपण परंपरा म्हणून पाहतो लोकांना आवाज आणि लग्न असे समीकरण माहितीचे झाले आहे.

               लोकांना फटाक्यांचा आवाज गोंधळ मोठा आवाज हे समारंभातील अविभाज्य घटक असल्याने लोक त्याचा आनंद लुटत त्यामुळे त्यांना त्रासही कमी होतो तथापि सातत्याने हे आवाज काढावा आढळल्यास अशा प्रकारचे आजार निर्माण होऊ.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट