घोरण्याच्या आजारावरील उपाय Remedies for Sore Disease
घोरण्याच्या आजारांवरील काही उपाय खालीलप्रमाणे
योग्य आहार व्यायाम आणि पुरेशी झोप ह्या गोष्टी केल्या तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. वजन आटोक्यात राखणं हा यातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो . लठ्ठ व्यक्तींमध्ये नाकाचा आकार लहान आणि पोटाचा घेर जास्त असतो. त्यामुळे श्वासोच्छवासाच मध्येच बंद होण आणि पुन्हा चालू होणे हा प्रकार होतो. प्रामुख्याने प्रयोगशाळेत या लोकांच्या झोपेचा अभ्यास केला जातो . या प्रयोगशाळेला झोप अभ्यासाची प्रयोगशाळा असं म्हटलं जातं. तिथे दर तासाला श्वास किती बंद पडतो याचे प्रमाण मोजले जातात. त्यावरून या आजाराची तीव्रता ठरवली जाते.
तासाला पंधरा वेळा श्वास बंद पडला तर त्याला एएचआय म्हणजे अँप्निया हिपनॉइया इंडेक्स असे म्हणतात. हा आकडा पंधराहून अधिक असेल तर या व्यक्तींना अधिक हवा मिळण्याची गरज असते.त्यासाठी सीपीएपी म्हणजे 'कन्टीनुयस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर' या साधनाचा वापर केला जातो. या साधनाच्या साहाय्याने नाकात हवेचा झोत सोडला जातो. त्यामुळे घशातला बंद झालेला मार्ग उघडतो तो तसाच उघडलेल्या अवस्थेत राहिल्यामुळे श्वास बंद पडण्याची प्रक्रिया रोखली जाते.
हवेचा झोत सोडण्याच्या या साधनाला स्लिप ऐप मशीन म्हटलं जातं. या मशीनमध्ये हवेचा झोत तयार होतो. रुग्णाच्या झोपेच्या प्रयोगशाळेत पहिल्या दिवशी अभ्यास केल्यावर त्याला किती दाब आवश्यक आहे ते ठरविला जात. तेवढ्या दाबाची हवा नाकासह तोंडातून आत सोडले जाते काही दिवस रोज या मशिनचा वापर केल्यानंतर रुग्ण हळूहळू बरा होऊ लागतो.
स्लीप अँप्निया आजारात झोपेतून वरचेवर जाग येण्याचे कारणही सूत्रांनी स्पष्ट केला आहे. रात्री प्राणवायू कमी झाल्यामुळे जाग येत राहते आणि व्यक्तीच्या नकळत हवेच्या शोध घेतला जातो. श्वसन प्रक्रिया सुरळीत नसल्यामुळे हा आजार येतो. काही रुग्ण या आजारातून मानसिक आजाराकडे वळतात. सहसा बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार आढळतो. घोरणं थांबविण्यासाठी वर सुचवलेल्या बाह्य साधन वापरून हवा पुरविण्याच्या उपायखेरीज इतर काही उपायही सुचवले जातात.
उताण झोपण्याआधी कुशीवर झोपावे असे सुचवले जात. कुशीवर झोपल्यामुळे घशातील स्नायू एका बाजूला झुकत आणि घोरणे बंद होत. झोपण्यापूर्वी वैद्यकीय सल्ल्यानं नाकात काही औषधी स्प्रे फवारली जातात त्यामुळे घोरणे बंद होतं. झोपण्यापूर्वी चार तासांचा अवधी पर्यंत मध्यपान न करणं आवश्यक असतं. खरंतर मध्यपान पूर्णपणे टाळणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या धूम्रपान घोरण्याच्या समस्येत भर घालत असल्याचे आढळून आला आहे. अति वजन हे घोरण्याच एक कारण असल्या मुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी पुरेसा व्यायाम करणे आवश्यक असते.
एकूणच घोरणं बदललेल्या जीवनशैलीच्या आणखी एक भयावह आजार आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात शारीरिक हालचाल करणं म्हणजेच किमान व्यायाम करणं आणि आहारावर नियंत्रण ठेवणं तसंच पुरेशा प्रमाणात झोप घेण आरोग्याचा दृष्टीने चांगला असतं. सहाजिकच जीवनशैलीशी निगडित इतर आजारांप्रमाणे या आजारातही वैयक्तिक स्वास्थ प्रमाणेच सामाजिक स्वास्थ्यही धोक्यात येत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा