घोरणे एक आजार Sore one disease
घोरणे ही केवळ शेजारी झोपणाऱ्या व्यक्तीची झोपमोड करणारी बाब नाही. तर त्यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीच्या अनारोग्य पूर्ण शारीरिक अवस्थेच दर्शन घडत असतं. त्यामुळे घोरण्याकडे वेळीच लक्ष पुरवून हा आजार आहे हे मान्य करण महत्वाचा आहे.
अगदी अलीकडेपर्यंत पूर्णही एक सर्वसामान्य बाब मानली जात होती. घोरणाऱ्या व्यक्तीमुळे त्यांच्या शेजारी किंवा आसपास झोपलेल्या लोकांना होणारा त्रास हा अनेक चित्रपट नाटकांमधील एक महत्त्वाचा प्रसंग असे. मात्र, घोरणं हा प्रकार विनोदी नव्हे तर काही आजारांचा घोतक असल्याचा अलीकडेच झालेल्या संशोधनामधून स्पष्ट झालं आहे.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये घोरण्याच्या प्रमाण अधिक असले तरी सहसा वजन अधिक असलेल्या व्यक्ती झोपेत करताना दिसतात आणि वयपरत्वे घोरण्याची प्रवृत्ती बळावत जाते. व्यक्ती क्वचित घोरत असेल तर ती बाब फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नसते परंतु घोरण्याची सवयच असेल तर ती व्यक्ती इतरांची झोपमोड करण्याबरोबरच स्वतःच्या झोपेचा दर्जा कमी करून घेते. सततच्या घोरण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. तोंडातील आणि नाकातील हवेच्या प्रवाहाला प्रत्यक्ष अडथळा येतो त्यावेळी व्यक्ती घोरते. विविध घटकांमुळे हवेचा प्रवाह अडथळे येत असतात. नाकातील नाकातील हवेच्या मार्गात अडथळा येणे हे धोरण यामागचे एक कारण आहे. काही लोक केवळ ऍलर्जीच्या मोसमात किंवा सायनस संसर्ग झाला तर घोरतात नाकातील पडदा वाकडा होणे किंवा असणं किंवा नाकातील मोड किंवा मांसवृद्धी यामुळे व्यक्ती घोरते.
घसा आणि जिभेतील स्नायूंचा पोत चांगला नसला तरीही व्यक्ती घोरते. ह्या दोन्ही अवयवांमधील स्नायू इतक्या टोकाच्या शिथील अवस्थेत असतात की ते कोसळतात आणि हवेच्या मार्गात येतात. आत्यंतिक झोप, दारूचे सेवन किंवा झोप येण्याच्या गोळा घेण्यामुळे हे घडू शकतं. याखेरीज वयोमानानुसार स्नायू शिथिल होतात. अति वजनामुळे गाळ्याच्या उती मांसल बनतात. याखेरीज टॉन्सिल्स मोठ्या आकाराची असलेली मूलही घोरतात.
लांब मऊ जिभेमुळे नाक आणि घसा यामधील पोकळी अरुंद बनते. पडजीभ थरथरते त्यावेळीं हवेच्या मार्गात अडथळा येतो आणि व्यक्ती घोरू लागते. घोरण्याच्या सवयीमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दिवसा डुलक्या काढण आणि रात्री घोरणं हा स्लिप अप्नियाचा आजार जडतो. झोपेत अडथळा येऊन वारंवार श्वास बंद पडण्याचा आजार अस स्लीप अप्नियाचा वर्णन करता येत.
स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक असतं. हे लोक झोपेत वारंवार घोरतात.
झोपेत घोरणाऱ्यांपैकी 10 टक्के लोकांना हा आजार जडलेला असतो. या लोकांची झोप रात्री पुर्ण झालेली नसते. त्यामुळे गाडी चालवताना, टीव्ही पाहताना, सहज बसलेले असताना किंवा कामाच्या ठिकाणीही ते डुलक्या काढतात. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्थूलपणा यापैकी कोणत्या तरी किंवा सर्व आजारांनी या व्यक्ती त्रस्त असल्याचे दिसते.
यासाठी या आजारावर मात करण्यासाठी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी केले जाणारे उपचार उपयुक्त ठरतात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा