तरुणांना हृदयरोगाचा धोका अधिक Youths are more at risk of heart disease
![]() |
risk of heart disease |
धूम्रपानाचे व्यसन, ताणतणाव, निकस आणि अनारोग्यकारक आहार, शारीरिक व्यायामाची कमतरता आणि मीठ व पैकेज खाद्यपदार्थांचे अति प्रमाणात सेवन ही प्रौढ तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढविण्याची प्रमुख कारणे आहेत.
हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण हे प्रौढवर्गात अधिक असते, असे सर्वसाधारण मानले जाते. मात्र, जगातील सर्वाधिक मृत्यूना कारणीभुत ठरणाऱ्या या विकारापासून प्रौढ, तरुण वयोगटातील व्यक्तीही सुरक्षित नाहीत, याची कुणाला फारशी कल्पना नाही. 'द कोरोनरी आर्टरी रिस्क डेवलपमेंट इन यंग adults ' ह्या संशोधक गटाने तरुण वयोगटातील व्यक्ती हृदयरोगास बळी पडण्याची शक्यता अधिक का असते व त्यांच्या बाबतीत हा धोका उत्पन्न करणारे कोणती कारणे आहेत याचा अभ्यास केला आहे. या संशोधनामध्ये 18 ते 30 वर्षे या वयोगटातील 5००० तरुणांवर 15 वर्ष देखरेक करण्यात आली व नेमक्या कोणत्या कारणामुळे त्याचा धोका आहे, याचा अभ्यास करण्यात आला.
तिशी व चाळीशीतील प्रत्येक पुरुष या विकाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. या अभ्यासातील निष्कर्ष अनुसार ज्या व्यक्ती दिवसाला 10 सिगारेट पितात त्याच्यामध्ये हृदयरोग निर्माण होण्याची शक्यता 50 टक्के असते. शिवाय कोलेस्टरच्या पातळीमध्ये वाढ झाली तरी 50 टक्के असतो.
शिवाय रक्तदाबाच्या पातळीत वाढ झाली तरी हृदयरोगाचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो.
धूम्रपानाचे व्यसन, ताणतणाव, निकस आणि अनारोग्यकारक आहार, शारीरिक व्यायामाची कमतरता आणि मीठ व पैकेज खाद्यपदार्थांचे अति प्रमाणात सेवन ही प्रौढ तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढविण्याची प्रमुख कारणे आहेत. या समस्यांवर नियंत्रण ठेवायचे तर मुळात त्यांना निमित्त ठरणाऱ्या गोष्टींचे प्रमाण कमी कसे करावे, हे समजून घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना नियमितपणे सकस आहार घेण्याची सवय लावली पाहिजे. व त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे रक्तदाबासंबंधी समस्यांवर नियंत्रण राहू शकेल कारण लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते.
आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रण ठेवायला हवे. त्यांना धूम्रपानातील धोके आणि रक्तपेशींवर कोणता परिणाम होतो हे समजवून सांगायला हवे . निकोटिनमुळे रक्तवाहिन्या चिंचोळ्या होतात व त्यातून रक्ताचे सहज सहन होत नाही. आहारावर नियंत्रण ठेवायचे खूप प्रयत्न करूनही आणि मुलांना शारीरिक कामांची सवय लावूनही रक्तदाब कमी होत नसेल तर त्वरित डॉक्टरांशी सल्लामसलत करून योग्य ती उपाययोजना करायला हवी.
शारीरिक श्रमांना फारसा वाव न देणारी बैठी जीवनशैली ही त्यामागची मुख्य समस्या आहे. आजचा तरुण हा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या तणावाखाली आहे. जर हृदयविकाराचे झटके टाळायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत मोठे बदल करायला हवेत जंकफूड किंवा निकस आहाराऐवजी सकस आहारावर भर द्यायला हवा. आपले वेळापत्रक कितीही दगदगीचे असले तरीही आपल्या जगण्याची नीट घडी बसविण्याचा, योग्य प्राधान्यक्रम निवडण्याचा प्रयत्न करायला हवा व संतुलित जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करायला हवा. योगा किंवा नृत्य किंवा व्यायामाचा आणखी कोणताही प्रकार जो तूम्हाला शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यास मदत करेल तो आपल्या जीवनशैलीत जरूर समाविष्ट करायला हवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा