पिंपल्सवर आयुर्वेदिक उपचार. Ayurvedic treatment on pimples in marathiy



Ayurvedic treatment on pimples
Ayurvedic treatment on pimples 

काही जणांच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स येतात त्यामुळे त्यांचा चेहरा खराब दिसतो. सर्वप्रथम आपण पिंपल्सची कारणे शोधली पाहिजे व त्यानुसार उपचार करण गरजेचा असता.

पिंपल्स येण्याची कारणे : 
       चेहऱ्याची नीट स्वच्छता न करणे, जंतुसंसर्ग,  त्वचा जास्त तेल कट असणे, अनावश्यक क्रीमचा वापर, डोक्यातील कोंडा, शरीरातील हार्मोन्समध्ये बदल, काही रासायनिक औषधांचे दुष्परिणाम, पुरुषांमध्ये दाढी करताना अस्वच्छ ब्लेडचा वापर, स्त्रियांमध्ये घेतल्या जाणाऱ्या हार्मोन्स असणारी औषधे यामुळे पिंपल्स उत्पन्न होऊ शकतात.
         त्याबरोबरच पोट साफ नसणे, पोटात कृमी, पित्ताचे प्रमाण अधिक असणे, कोलायटीस, रक्तात वाढणारी उष्णता, मसालेदार पदार्थांचे तसेच तळलेल्या  पदार्थांचे वारंवार सेवन, अतिमद्यपान, मासिक पाळीतील अनियमितपणा, सतत उन्हात काम, जागरण, मानसिक ताण-तणाव या गोष्टीदेखील पिंपल्स उत्पन्न होण्यासाठी मदत करतात. काही वेळा अनुवंशिकता हेदेखील कारण सापडते.

शास्त्रीय आयुर्वेद उपचार 
          आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करताना स्थानिक उपचार व पोटातील औषधे आणि पथ्यपालन या त्रिसूत्रीचा वापर केला जातो. या गोष्टी एकाच वेळी अमलात आणल्या जातात.

 स्थानिक उपचार
         पिंपल्स असणाऱ्यांनी दिवसातून किमान चार ते पाच वेळा चेहरा स्वच्छ धुवावा. यानंतर दिवसातून एक वेळा वनस्पती चूर्णाचा लेप चेहर्‍यावर लावावा. यासाठी कृमिनाश करणारी, सूज घालविणारी, दाहशामक, जखम भरून आणणारी, त्वचा वर्ण पूर्ववत करणारी इत्यादी विविध कार्यकारी चूर्ण एकत्र केली जातात. सर्वांना सरसकट एकच लेख न करता प्रत्येकाच्या मुळ त्वचेचा आणि पिंपल्सच्या स्वरूपाचा विचार करून विविध प्रमाणात ही चूर्ण एकत्र केली जातात. चंदन, रक्तचंदन, हळद, आंबेहळद, जेष्ठमध, सारिवा, मंजिष्ठा, आवळकाठी,  तुळस, मुलतानीमाती, जीतसायन, शंकाजिरे, शंकभस्म यांसारख्या औषधींचा वापर केला जातो.

पोटामधील औषधे 
आयुर्वेदिक पद्धतीत अष्टविध परीक्षा करून पिंपल्सची कारणे शोधली जातात. ती कारणे दूर करणारी रक्‍तशुद्धीका वर्ण शुद्ध करणारी औषधे वापरली जातात.
         वनस्पतीज औषधांपैकी त्रिफळा, सारिवा, मंजिष्ठा, विंडग, चंदन, रक्तचंदन, जेष्टमध, निंब, कोरफड, हळद, खवीर, आवळा, अशोक, अश्वगंधा, काळाकोळ, कांचनार, वरून, भुई, आवळा, इत्यादींचा तर शांकभस्म, प्रवाळभस्म, कफदिक, शोतीकभस्म, मौक्तिक भस्म, अकिकापिटी, कज्जली,
गंधक या खनिज औषधांचा वापर केला जातो.
अर्थात ही औषधे एकेरी न वापरता यांच्या विविध मिश्रणातून झालेल्या गोष्टींचा वापर करावा लागतो. या पोटातील औषधांबरोबरच मसालेदार, तिखट, तळलेले पदार्थ, मांसाहार, दही, अंडी, या गोष्टी टाळणे भरपूर पाणी पिणे हे देखील महत्त्वाचे असते.

          शास्त्रीय आयुर्वेद उपचारांचा फायदा वरील पद्धतीने तज्ज्ञांकडून उपचार घेतल्यामुळे पिंपल्सचे सर्वांगीण उपचार होतात. त्वचेचा वर्ण पूर्ववत होतो. काही काळाने डाग जातात. खड्डे भरून येतात व त्याच्या पूर्वीप्रमाणे सुंदर होते. तसेच या पद्धतीत कारणांचा शोध घेऊन ती दूर केली जात असल्याने पुन्हा पुन्हा पिंपल्स उटण्याची शक्यता राहत नाही.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट