शांत झोपेआड येणारे अडथळे
दिवसभरात आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये सकाळी उठण्याची वेळ, जेवण, बसण्याची स्थिती, झोपणे आदी गोष्टींचा उल्लेख करता येईल. शरीर नेहमी ताजेतवाने राहण्यासाठी जसा पोषक आहार महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे आवश्यक असते ती झोप.
मात्र, अनेकांना दिवसभर काम करूनही रात्रीच्या वेळी झोप लागत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात नेहमी आळस भरलेला असतो. अनेकांना पाय दुखणे, कंबर दुखणे, डोके दुखणे, सर्दी, ताप आदी कारणांमुळे देखील रात्री झोप लागत नाही. परंतु आपण ज्या पद्धतीने झोपतो त्याचा परिणाम देखील तुमच्या झोपेवर होतं असतो. तुम्ही ज्या पद्धतीने झोपता त्या स्थितीनुसार शरीरातील रक्तप्रवाह प्रवाहित होत असतो. झोपेत अनेकांना एकाच अंगावर झोपण्याची सवय असते. त्यामुळे देकील तुमची झोप मोड होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शांत झोप मिळत नाही.
अपचन : पोटापासून ते छातीपर्यंत जळजळ होणाऱ्या क्रियेस ऍसिड रिप्लेक्स असे म्हणतात. अनेकांना झोप पूर्ण न होणे, वेळी अवेळी जेवण यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे सतत करपट ढेकर येण्याचा त्रास, पोटात गॅसेस तयार होण्याचा त्रास होतो. अशा प्रकारचा त्रास होत असेल तर, उजव्या कुशीवर झोपणे फायद्याचे ठरू शकते. यामध्ये दोन्ही हात समोरच्या बाजूला तसेच गुडघे छातीच्या बाजूला असले पाहिजे . आपल्या शरीरात अन्ननलिका ही पोटाच्या डाव्या बाजूला जोडलेली असते. जेंव्हा आपण उजव्या बाजूच्या कुशीवर झोपतो त्यावेळी आपण ग्रहण केलेले अन्न चांगल्या पद्धतीने पचन होण्यास मदत होते. दरम्यान, ऍसिड रिप्लेक्स समस्या असणाऱ्यांनी झोपण्याच्या दोन तास आधी साधारण जेवण करावे. यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते.
कमरेचा त्रास : कंबरेचा त्रास होत असेल तर रात्री झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे झोप लागत नसेल तर, झोपताना कोणत्याही एका कुशीवर दोन्ही हात समोरच्या बाजूने आणि गुडघे हलकेसे वळलेले अश्या पद्द्तीने झोपण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय गुडघ्यांच्या खाली एकादी उशीदेखील ठेवू शकता. सुरुवातीच्या काळात अशा पद्धतीने झोपणे त्रासदायक ठरू शकते. मात्र जसा जसा तुम्हाला आराम मिळण्यास सुरवात होईल तुम्हाला शांत झोप लागेल. यामुळे तुमचा दुसरा दिवस आनंदात आणि प्रसन्न जाण्यास मदत होईल.
नाक बंद असणे : अनेकांना थंडीच्या दिवसात सर्दीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यामुळे नाक बंद होत असल्याने श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. या कारणांमुळे रात्री शांत झोप लागण्यास त्रास होतो. तर काहींना धुळीची अथवा एकाद्या गोष्टीची अलर्जी असेल तरीदेखील सर्दीचा त्रास होऊ शकतो. ज्या व्यक्तींना सायनसचा त्रास आहे अशांनी देखील पाठीवर झोपने टाळले पाहिजे. सायनस आणि सर्दी असणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही एका कुशीवर दोन उश्या घेऊन झोपावे .यामुळे तुमचे डोके थोडे वर राहण्यास मदत होईल आणि नाक बंद होण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल. यामुळे झोप न लागणे अथवा सतत झोपमोड होण्याची समस्या कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होईल
घसा दुखत असल्यास काही जणांना खाण्यात बदल झाल्यास अथवा पाणी बदल्यास घसा दुखण्याची समस्या उद्भवते. यामुळे देखील रात्री झोप न लागणे अथवा सारखी झोप मोड होण्याची समस्या निर्माण होते. अशा व्यक्तींनी पाठीवर झोपणे उचित ठरते. त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. अनेकांना रात्री झोपेत दात एकमेकांवर आदळण्याची सवय असते. याचा परिणाम तुमच्यावर दातावर होण्याची तसेच दातांचा आकार प्रभावित होण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपताना अशा व्यक्तींनी दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून शरीर रिलॅक्स करून झोपणे उचित ठरते.
झोपण्यापूर्वी हे करा.
शांत झोप लागण्यासाठी तुमचे शरीर रिलॅक्स असणे आवश्यक आहे. यासाठी झोपण्यापूर्वी हात आणि पाय आणि चेहरा स्वच्छ धुवावे. तसेच महिलांनी चेहऱ्याला लावलेला मेकअप काढून टाकावा. हातांना आणि पायांना नारळाचे तेल लावू शकता. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. झोपताना शक्यतो ढिले कपडे घालून झोपावे . अति घट्ट कपडे घालून झोपल्यानंतर की झोप न लागणे किंवा झोप मोड होण्याची शक्यता असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा