जास्त घाम येत असेल तर कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो.
शरीरातून घाम बाहेर पडतो तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित राखली जाते. घाम येणे हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. घाम प्रमाणापेक्षा कमी आला किंवा प्रमाणापेक्षा अधिक आला तर तो एखाद्या व्याधीचे लक्षण ठरू शकते. प्रमाणापेक्षा अधिक घाम असेल तर त्याला हायपर डायड्रोसिस म्हणतात. प्रमाणापेक्षा अधिक घाम येणाऱ्या व्यक्तीने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
प्रमाणापेक्षा अधिक घाम येण्याची आणखी कारणे खालीलप्रमाणे : हार्मोन संबंधातील औषधे तसेच मधुमेह थायरॉईड उच्च रक्तदाब या वर्षात औषधांमुळे अधिक घाम येतो.
संसर्गजन्य व्याधी, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोग, हृदय आणि फुसुसासंबंधींचे आजार असणाऱ्यांना सुद्धा कधी घाम येतो. काही महिलांना मासिक पाळी दरम्यान अधिक घाम येण्याची समस्या जाणवते .
मेंदूच्या समस्या असणाऱ्यांनाही अधिक घाम येऊ शकतो. सातत्याने शरीरातून प्रमाणापेक्षा अधिक घाम येऊ लागला तर डॉक्टरशी संपर्क साधा यामुळे तुम्हाला काही गंभीर व्याधी असेल तर तिचे निदान आधीच होऊ शकते.
अधिक घाम येणाऱ्यांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
थंड पाण्याने अंघोळ करावी .
सुती आणि लीलनचे कपडे वापरावेत .
घामाचे डाग कपड्यांवर पडू नयेत यासाठी अंडरआर्म पॅड वापरावेत .
अँटी बॅक्टेरियल साबणानेच आंघोळ करावी. अशा साबणामुळे त्वचेवर विषाणूंची निर्मिती होत नाहीत. त्वचेवर विष्णूंची निर्मिती न झाल्यास आपल्या घामाला दुर्गंधी येत नाही.
रात्री झोपताना आपल्या हाताच्या आणि पायांच्या तळव्यांना अँटी पर्सीपेरन्ट लावावे.
योगासने, प्राणायाम याद्वारे मनावरचा ताण दूर होतो. मनावरच्या ताणामुळे यामुळे अनेकदा घामाचे प्रमाण वाढत असते.
घाम अजिबात येत नसेल किंवा नेहमीपेक्षा खूप जास्त येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. याचबरोबर शरीरातून येणाऱ्या वासामद्ये बदल झाला असेल, तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या संदर्भात त्वचाविकार तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे योग्य ठरते.
प्रमाणात घाम येतो अशा लोकांनी उन्हाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते. उन्हाळ्यात अशा व्यक्तीने ताजे जेवण घ्यावे व हलका आहार घ्यावा. काकडी, पुदिना, संत्री, टरबुज यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमद्ये सोडियमचे प्रमाण खूप कमी असते.
उन्हाळ्यात दही, ताक यांचे सेवन करणे आवश्यक असते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहते. उन्हाळ्यात अशा व्यक्तींनी भरपूर कांदा खावा. कांद्यामध्ये उन्हापासून त्वचेवर होणारे परिणाम रोखले जातात. टरबूज, कलिंगडे, हे खास उन्हाळ्यातील पदार्थ समजले जातात. त्यामध्ये 90 टक्के पाणी असते.
उन्हाळ्यात शरीराला खूप जास्त घाम येतो. या पदार्थामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. ज्या पदार्थांमध्ये पौष्टिकता भरपूर आहे असे अन्नपदार्थ उन्हाळ्यात आहारात समाविष्ट करावेत.
अधिक घाम येण्याबरोबरच घामाला दुर्गंधी येणे हेही आरोग्याची समस्या मानले जाते. बॉडी स्प्रे किंवा डिओड्रंट फवारून तुम्ही काही दिवस वेळ मारून नेऊ शकता. मात्र नोकरदारांना अशा व्याधींवर तातडीने उपचार करून घेणे योग्य ठरते. तुमच्या घामाला दुर्गंधी येत असेल तर मित्र सहकारी तुमच्याजवळ घेणे टाळू लागतात. तुम्हाला कोणी तुमच्या घामाच्या दुर्गंधी बद्दल बोलत नाहीत, मात्र त्यांचे वर्तन तुम्हाला टाळायचे असते. आपल्या घामाला दुर्गंधी येत आहे हे कळल्यावर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा