दंत समस्यांकडे दुर्लक्ष नको Do not neglect dental problems
![]() |
dental problems |
दातांखाली असणाऱ्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याने हिरड्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. हिरड्यांचे विकार ही सर्वसाधारण समस्या असली तरी दातांवर याचे विपरीत परिणाम होत असतात. हिरड्यांशी संबंधित विकारांचे दोन टप्पे असतात. पहिल्याच टप्प्यात रोग निदान झालं तर समस्या मुळापासून दूर करता येते. पहिल्या टप्प्याला जिंजिविटिस असे म्हटले जाते. शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर पेरीओडोंटिटिस नावाचा विकार होऊ शकतो.
दातांच्या स्थितीवरून माणसाचा शारीरिक आरोग्य जाणून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला टुथोलॉजी रोजी असं म्हटलं जातं. दातांचा रंग, पोत आणि सर्वसाधारण अवस्था बघून शारिरिक आरोग्याचा अंदाज बांधला जातो.
पिवळी नखे, डोळ्याखालची काळी वर्तुळे, डोकेदुखी ही गंभीर विकाराची लक्षणे मानली जातात. पण तुमचे दात ही या विकारांचे संकेत देत राहतात. दुर्देवाने किंवा अजाणतेपणी आपण या संकेतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो.
दात दुखत असेल किंवा तुटला असेल तर डेंटिस्टकडे जायलाच हवं असा आपला सर्वसाधारण समज असतो. दात विविध विकारांचे संकेत देत असतात. पण त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे डेंटिस्टकडे वरचेवर जायला हव. दातांची नियमित तपासणी करून घ्यायला हवी. दातांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून डेंटिस्टकडे जाणं टाळू नये. जबड्याच्या वरच्या भागात वेदना होण्याचे मुख्य कारण सायनसिटीस असू शकतं. जंतु संसर्गामुळे ही समस्या उद्भवते.
दातांची संवेदनशीलताही सर्रास आढळणारी समस्या आहे. थंड, गरम किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर दातांमध्ये झिणझिण्या जाणवतात. पण याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यांची संवेदनशीलता गंभीर समस्येकडे अंगुलीनिर्देश करू शकते. अॅसिडिटी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांचा सामना तुम्ही करत असू शकतात या समस्यांचे हे लक्षण असू शकता. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
दातांवर ताण दिल्याने किंवा सतत जीभ फिरवल्याने ते सपाट होऊ शकतात. यामुळे गालालगतच्या स्नायूंना थकवा येतो. तुमच्या दातांचा आकार सपाट झाला असेल तर दातावरून ची फिरवण्याची किंवा दातांवर दात ठेवून ताण देण्याची सवय सोडावी लागेल हे लक्षात घ्या.
तोंड येणे हे रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याचे लक्षण असू शकते. ही शक्यता खरं तर दुर्मिळ आहे. तोंड येणे हे भविष्यातल्या तोंडाच्या आणि घशाच्या कॅन्सरच लक्षण असू शकतं.
तोंड कोरडे पडणे मधुमेहाचं लक्षण असू शकतं. मधुमेहामुळे लाळेच्या ग्रंथी जाड होतात आणि यामुळे लाळनिर्मितीचे प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे डोळ्यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अनेक पटीने जास्त असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा