पिंपल्स प्रॉब्लेम pimples problem in marathi


pimples
pimples
                             

            आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक असणाऱ्या विविध गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे सुंदर चेहरा. फक्त चेहरा जरी सुबक, नितळ कांतीचा , स्वच्छ असेल तरी व्यक्तिमत्त्वाच्या इतर बाबी काहीवेळा गौण ठरतात. इतके चेहऱ्याचा सौंदर्याचे महत्त्व आहे.

           या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवणाऱ्या काही गोष्टी असतात. वांगाचे डाग, डोळ्याखालची काळी वर्तुळे, पांढरे डाग या विकाराबरोबरच मुरमे म्हणजे फोड आणि तारुण्यपिटिका हा चेहऱ्याच्या सौंदर्यावर आघात करणारा एक विचार आहे. मुलगी किंवा मुलगा तारुण्यात पदार्पण करताना याची सुरुवात होते. अनेक जण याच्यावर मग जाहिरातीमध्ये पाहून वेगवेगळे क्रीम्स लावतात. काहीजणांचा थोड्या कमी होतं पण पूर्णपणे जात नाहीत. तर काहींना कोणताच फायदा होत नाही. काही जण पुस्तकी ज्ञानवरुन अथवा ऐकीव विविध लेप लावतात. यातही काहींना थोडा आराम पडतो. तर काहींना कोणताच परिणाम मिळत नाही. क्रिमचा लेप लावल्यामुळे आजार कमी होणे सोडाच उलट वाढला असे सांगणाऱ्यांची कमी नाही.

          एकादा फोड दिसला तरी चिंताग्रस्त होणारे असतात तर काही जण जवानी मुळे होत आहेत असा विचार करून दुर्लक्ष करणारे असतात. फोड फोडून टाकून तो स्वच्छ केला त्यातील स्त्राव, बीज काढून टाकले म्हणजे तो जाईल या गैरसमजाने अनेक जण फोडतात. काहींना तर वारंवार आरश्यामदे पाहून फोड फोडण्याची सवय जडलेली असते.

           असे फोड फोडल्याने ते कमी होत नाहीतच उलट त्यांचा प्रसार वाढत जातो. फोडल्यामुळे जखमा होतात त्या भरून आल्यावर डाग उत्पन्न होतात. काही जणांचे चेहऱ्यावर खड्डे पडून चेहऱ्याचा गुळगुळीतपणा कमी होतो. अँटिबायोटिकस घेतल्यामुळे झालेल्या जखमांमधून जंतू संसर्ग कमी होतो. पु येणे कमी होते थोडे बरे वाटते पण हा परिणाम अनेकदा तात्पुरता असतो. काही काळाने पुन्हा वाढू लागतात सुरुवातीला चेहऱ्यावर असणारे फोड काहींना मानेवर पाठीवर देखील जाणवू लागतात.

              ब्युटीपार्लरमध्ये जाऊन फेशिअल ट्रीटमेंट घेतली जाते. यामुळे ही पिंपल्स काही काळ कमी होतात पण कालांतराने पुन्हा दिसू लागतात.

हे असे का होते.
             या विकाराने त्रस्त प्रत्येक तरुनींच्या मनात माझ्या पिंपल्स बरा का होत नाहीत? हा प्रश्न भेडसावत असतो, याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार थोडा फार भिन्न असतो. प्रत्येकाच्या पिंपलचे कारण, त्याचा प्रकार हा भिन्न असतो. तसेच आलेल्या पिंपल्सचे मूळ कारण शोधून ते दूर करणे महत्त्वाचे असते. केवळ एखादा लेप लावून किंवा क्रीम लावून ते दूर होत नाहीत. हे कारण दूर करण्यासाठी अनेक उपचाराच्या जोडीला या कारणांचा नाश करणारी पोटातील औषधे काही काळ घ्यावी लागतात. तसेच ही कारणे पुन्हा होऊ नयेत म्हणून काही आहाराची पथ्ये पाळावी लागतात.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट