घाम आणि आरोग्य Sweat and Health


Sweat and Health
Sweat and Health


घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर या प्रक्रियेचा वापर करते. या प्रक्रियेद्वारे शरीरातील विविध रसायने आणि हार्मोन्सचे संतुलन कायम ठेवले जाते. मात्र अधिक घाम येणे हे आरोग्य ठीक नसल्याचे निर्देश मानले जाते. प्रमाणापेक्षा अधिक घाम येण्याने शरीराच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामामुळे अनेकांचे हाल होतात. सध्याच्या धावपळीच्या जगात घाम येण्याचा त्रास अधिकच जाणवतो.

      घरातून आवरून टापटीप होऊन निघालेले ऑफिसला जाईपर्यंत घामाघूम होऊन जातात. काही लोकांच्या घामाला त्यांत घाण वास असतो. अशा लोकांनी कितीही डिओड्रंट वापरले तरी घामाची दुर्गंधी येतच राहते. घाम येणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नाही. कारण ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र जेव्हा एखाद्याला प्रमाणापेक्षा अधिक घाम येऊ लागतो, तेव्हा मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. अधिक घाम येण्याच्या समस्येला हायपर  डायड्रोसिस असे म्हणतात. चेहरा, हाताचा तळवा, पायाचे तळवे येथे अनेकांना प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो.

           घाम येणे आरोग्याच्या दृष्टीने जरुरीचे असते. मात्र तो प्रमाणात आला असता तर आपले आरोग्य ठीकठाक आहे, असे समजावे. अन्यथा शरीरात काही समस्या निर्माण झाल्या आहेत, असे समजले जाते. शरीरातून किती घाम बाहेर यावा आहे याबाबतचे निच्छित परिणाम सांगता येत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र शरीरातून घाम आलाच पाहिजे. घाम हे शरीराचे संरक्षण करणारी नैसर्गिक पध्दती आहे. घाम येण्यामुळे शरीर थंड राहते. शरीराचे  उष्णतेपासून संरक्षण होते . तसेच वेगवेगळ्या संसर्गापासून शरीराचा बचाव होतो. शरीर गरम झाल्यावर शरीरातून घाम येतो.

        शरीरातील अल्कोहोल, कोलेस्ट्रॉल, मीठ यांचे प्रमाण वाढल्यास त्यांना बाहेर काढण्याचे कामही घामाद्वारे केले जाते. घामामध्ये अँटी मायक्रोबियल पेपथाईड पदार्थ असतो. हा पदार्थ क्षयरोगसारख्या असाध्य व्याधीशी लढताना उपयोगी ठरतो. घाम येण्याचे संबंध शरीरातील अंतर्गत घडामोडींची सुद्धा असतो. चिंता, भय, तणाव या कारणांमुळे त्वचेतून घाम बाहेर येतो. तरुण पणाला सुरवात झाल्यावर शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. त्यामुळे शरीरातील लाखो घामग्रंथी कार्यरत होतात. शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाशी विषाणूंचा संपर्क आल्यास घामाला दुर्गंधी येत राहते. हायपर हायड्रोसिस नामक  व्याधी असलेल्या व्यक्तींना सर्वसामान्य पेक्षा अधिक घाम येतो. या लोकांवर हवामान किंवा मूडचा काहीच परिणाम होत नाही. हायपर हायड्रोसिस हि समस्या मज्जासंस्थेशी निगडित आहे.

          प्रमाणापेक्षा अधिक घाम येणे हे एखाद्या गंभीर व्याधीची लक्षणे सुद्धा असू शकते. स्थूल व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात जाणवते. आरोग्य तज्ञांच्या मते 50 टक्के लोकांमध्ये ही समस्या अनुवंशिक असते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट